पुणे/प्रतिनिधी
नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल असे प्रतिपादन राज्याचे शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी केले.
दिनांक 25 जून २०२२ रोजी पुणे येथे
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जलतज्ञ डॉ.राजेंद्र सिंह यांचे उपस्थितीत झालेल्या बैठकीमध्ये राज्याचे आयुक्त शिक्षण सुरज मांढरे यांनी डॉ.राजेंद्र सिंह आणि बॉस्निया आणि हर्झगोव्हिनाचे राजदूत श्री मोहम्मद चेनेक यांच्या उपस्थितीमध्ये असे प्रतिपादन केले.
डॉ.राजेंद्र सिंह म्हणाले, लोकसहभागातून नद्या पुनरुज्जीवित होऊ शकतात आणि त्यांना पूर्व स्वरूप प्राप्त करून देता येऊ शकेल हे सिद्ध करून दाखवलेले आहे. राजस्थानमध्ये सुमारे 13000 जोहाड बांधून केले आहे. महाराष्ट्रातील नद्यांची स्थिती गंभीर असून प्रदूषणाचे प्रमाण आणि शोषण हे तीन मुद्दे प्रामुख्याने आढळतात यामध्ये प्रदूषणावर काम करण्यासाठी नदीला जाणून घेणे गरजेचे आहे. नदी जाणून घेतल्यानंतर माझी जबाबदारी आहे या भावनेतून काम करणे गरजेचे आहे. म्हणून नदी साक्षरता आणि जलसाक्षरता गरजेचे आहे.महाराष्ट्र राज्यात नद्यांची अवस्था आज अत्यंत बिकट आहे .अनेक नद्या रुग्णशय्येवर आहेत. काही नद्या यातून बाहेर यायला बराच कालावधी लागू शकेल. तथापि समाजाने एकत्रित येऊन हे काम केल्यास नद्यांना पूर्व स्वरूप प्राप्त होऊ शकेल. यासाठी शालेय विद्यार्थ्यांना या अभियानात सहभागी करून घेण्यासाठी नदी साक्षरता अभियान सुरू करण्याचा मनोदय डॉ.राजेंद्र सिंह यांनी व्यक्त केला.
नवीन शिक्षण नीती यामध्ये देखील याचा अंतर्भाव करता येऊ शकेल याबाबत देखील चर्चा झाली. माझी वसुंधरा अभियानाच्या माध्यमातून देखील नदी साक्षरता अभियान स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राबविता येईल.
याप्रसंगी जलनायक राजेश पंडित,
जलसाक्षरता केंद्राचे निवृत्त कार्यकारी संचालक डॉ. सुमंत पांडे, तरुण भारत संघाचे उपाध्यक्ष डॉ.खुराणा,नरेंद्र चुग, विनोद बोधनकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
डॉ.राजेंद्र सिंह व श्री सुरज मांढरे यांनी
नदीकी पाठशाला या उपक्रमाचे कौतुक यांनी केले.डॉ.राजेंद्र सिंह यांनी श्री. मांढरे यांनी केलेल्या गोदावरी नदीच्या संवर्धन कामाची प्रशंसा ही केलेली आहे.