भेंडा
नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा विद्यार्थी समर्थ पाउलबुद्धे याला दहावीच्या परीक्षेत 85.40 टक्के गुण मिळाल्याबद्दल त्याचा लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र घुले पाटील यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.
कारखान्याचे उपाध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग,जेष्ठ संचालक अड.देसाई देशमुख,काशिनाथ नवले ,काकासाहेब नरवडे, काकासाहेब शिंदे,अशोकराव मिसाळ, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष विठलराव लंघे,कार्यकारी संचालक अनिल शेवाळे,सचिव रवींद्र मोटे,कामगार संचालक सुखदेव फुलारी, रामभाऊ पाउलबुद्धे, विलासराव लोखंडे,इब्राहिम शेख आदि यावेळी उपस्थित होते.