भेंडा
राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला.
यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे म्हणाले,
आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आठ वर्षातील यशस्वी कार्यकाळाची प्रेरणा घेऊन महाराष्ट्र मध्ये ही भारतीय जनता पार्टी-शिवसेना युतीचे सरकार लवकरच येणार आहे व मी पुन्हा येणार हे अडीच वर्षांपूर्वी सांगणारे भारतीय जनता पार्टी व शिवसेनेचे युतीचे शिल्पकार माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी परत “मी पुन्हा येणार” हा शब्द खरा ठरवून दाखवला आहे. त्यावेळी अनेकांनी चेष्टा मस्करी केली. परंतु नेतृत्वामध्ये दम असला पाहिजे तरच हे सत्ता परिवर्तन घडू शकतं हे त्यांनी सिद्ध केले आहे.
यावेळी भाजप तालुकाध्यक्ष भाऊसाहेब फुलारी, विश्वासराव काळे, अण्णासाहेब गव्हाणे, बाबासाहेब वाघडकर, देवगावचे सरपंच विष्णू गायकवाड, देवेंद्र काळे, समीर पठाण, विनायक मिसाळ, जावेद शेख, नवनाथ फुलारी, संभाजी सोनवणे, बाबासाहेब शिरसाठ, महेश फुलारी, सुनील साळवे, रामचंद्र गंगावणे आदी उपस्थित होते.