माय महाराष्ट्र न्यूज:देशांतर्गत वायदे बाजार म्हणजे MCX वर बुधवारच्या सत्रात सोन्या-चांदीच्या दरात वाढ नोंदवली आली आहे. देशांतर्गत वायदा बाजारात सोन्याच्या किमती वाढत असताना
बुधवार सकाळी सोन्याचे ऑगस्ट फ्युचर्स मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर ०.०९% किंवा ४६ रुपयांनी वाढीसह ५८,८०९ रुपये प्रति १० ग्रॅमवर व्यवहार तर ऑक्टोबर २०२३ रोजी डिलिव्हरीसाठी
सोने ०.०९% किंवा ५३ रुपयांनी वाढून ५९,१०८ रुपये प्रति १० ग्रॅमवर व्यवहार करत होते. दुसरीकडे, चांदीच्या किमती किरकोळ घट झाली आहे.एकीकडे सोन्याच्या दरात वाढ होत असताना दुसरीकडे चांदीच्या
दरात घसरण झाली आहे, म्हणजे चांदी स्वस्त झाली आहे. MCX वर जुलै २०२३ रोजी डिलिव्हरीसाठी असलेल्या चांदीचा भाव ०.०३% किंवा १९ रुपये घसरून MCX वर ७० हजार ३६८ रुपये प्रति किलोवर व्यवहार करत आहे.
दुसरीकडे, गुडरिटर्न वेबसाइटनुसार सोन्याच्या प्रति तोळा दरात ३०० रुपयांची घट झाली आहे. अशा २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ५४,७०० रुपये तर २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्यासाठी कालच्या बंदच्या
तुलनेत ३३० रुपयांची घसरण होऊन ५९,६७० इतकी किंमत मोजावी लागेल. दरम्यान, आज सराफा बाजारात प्रति किलो चांदीची किंमत १००० रुपयांनी कमी झाली आहे. म्हणजे आज तुम्हाला खरेदीवर कालच्या
६४ हजार रुपयांच्या तुलनेत ७३,००० रुपये प्रति किलो मोजावे लागणार.२०२३-२४ साठी सार्वभौम गोल्ड बाँड योजनेची पहिली मालिका १९ जूनपासून लाँच झाली असून यामध्ये २३ जूनपर्यंत गुंतवणूक करता येईल. तसेच
ऑनलाइन गुंतवणुकीसाठी ५० रुपयांची सूट उपलब्ध असून सार्वभौम गोल्ड बाँडमधील गुंतवणुकीवर २.५०% वार्षिक व्याज मिळतो. इच्छूक या योजनेत ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही प्रकारे गुंतवणूक करू शकता.