Thursday, August 11, 2022

नेवासा शहरात 45 हजार रुपये किंमतीची गोवंश जातीची 8 जनावरे पकडली

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

नेवासा शहरात 45 हजार रुपये किंमतीची गोवंश जातीची 8 जनावरे नेवासा पोलिसांनी पकडली आहेत.

याबाबद पोकॉ रवि गोविंद पवार सरकारतर्फे फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हंटले आहे की, दि. 3/7/2022 रोजी सकाळी 10.30 वाजेचे सुमारास मी, पोसई भाटेवाल , पोहेकॉ गिते असे आम्हाला ठाणे अंमलदार सफौ कानडे यांनी बोलावुन कळविले की, यावेळी अहमदनगर कंट्रोल यांनी फोनद्वारे कळविले की, पशु वैद्यकिय अधिकारी आबासाहेब नाईकवाडी यांनी कंट्रोल येथे फोन करुन कळविले की, नेवासा शहरात आयशा मज्जीदचे पाठीमागे आयाज चौधरी व आब्बास चौधरी यांनी पन्नास ते साठ गोवंश गायी बांधुन ठेवल्या आहे. तसेच सिद्दीक चौधरी यांनी तीन गाया कापुन त्याची विक्री चालू आहे असे कळविलेवरुन सदर ठिकाणी खात्री करणेकामी आम्हाला जाण्यास सांगितल्याने आम्ही रवाना झालो. सदर ठिकाणी जावुन खात्री केली असता सदर ठिकाणी लहान मोठी घराचे आसपास गोवंश जातीची जनावरे भुकेल्या अवस्थेत करकचुन दाव्याने बांधलेली दिसली. त्यानंतर आम्ही दोन पंच व सपोनि थोरात, पोना गायकवाड यांना घटना ठिकाणी खाजगी वाहन घेवुन बोलावुन घेतले. सदर जनावरांच्या मालकी बाबत आजु बाजुला विचारपुस केली असता सदर जनावरे हे अय्यास लालु चौधरी, अकिल जाफर चौधरी व मुस्ताक उस्मान शेख तीघेही रा. नाईकवाडी मोहल्ला, नेवासा खु. ता. नेवासा जि. अहमदनगर यांचे मालकीची असल्याचे आम्हास खात्रीशीर माहिती मिळाली आहे.
सदर ठिकाणी 14 हजार रुपये किंमतीची एक काळे पांढरे रंगाची
दिड वर्षे वयाची जर्सी गाय,
10 हजार रुपये किंमतीची एक तांबड्या पांढरे रंगाची पुढे शिंगे
दोन वर्षे वयाची असणारी गाय,
3 हजार रुपये किंमतीची एक काळे पांढरे रंगाची सहा महिने वयाची कालवड, 3 हजार रुपये किंमतीची एक काळे सं.ची पांढरी शेपुट असलेली कालदड, 4 हजार रुपये किंमतीचा एक तांबड्या रंगाचा आठ महिने वयाचा
गोऱ्हा, 2 हजार रुपये किंमतीचा एक काळ्या पांढऱ्या रंगाचा आठ महिने वयाचा गोऱ्हा,5 हजार रुपये किंमतीचा एक पांढरा कोसा रंगाचा दोन वर्षे वयाचा गोऱ्हा, 4 हजार रुपये किंमतीचा एक काळे रंगाचा गळ्याजवळ पांढरे ठिपके असलेला गोऱ्हा असे एकूण 45 हजार रुपये
किंमतीचे गोवंश जातीची जनावरे दाव्यांनी करकचून बांधलेली भुकेली व तहानलेली मिळुन आलेने सदरची जनावरे आम्ही सोबत आणलेल्या पंचासमक्ष पोहेकाँ गिते यांनी पंचनामा करुन ताब्यात घेतली सदर जनावरांची जागीच पशुवैदयकीय अधिकारी नेवासा खु. यांना लेखी पत्र देवून त्यांचेकडुन तपासणी करुन घेतली. तसेच सदरची जनावरे सुरक्षीत ठेवुन सांभाळ करण्यासाठी आनंद गो संरक्षण संस्था खडका फाटा ता. नेवासा यांना लेखी पत्र देवुन सांभाळ करुन सुरक्षीत ठेवण्यासाठी जमा केली आहेत.
या फिर्यादीवरून अय्यास लालु चौधरी, अकिल जाफर चौधरी, मुस्ताक उस्मान शेख तीघे रा. नाईकवाडी मोहल्ला, नेवासा खु. ता. नेवासा यांचे विरुद्ध नेवासा पोलिस ठाण्यात भारताच्या प्राण्यास निर्दयपणे वागविण्याचा अधि नियम 1960 चे कलम 11(1) (एच) व महा प्राणी संरक्षण कायदा व सुधारणा अधिनियम 1995 चे कलम 5 (ब) व 9 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

ताज्या बातम्या

भेंडा बुद्रुक ग्रामपंचायत हर घर तिरंगा अभियान राबविणार-सरपंच प्रा.उषा मिसाळ

नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक ग्रामपंचायत हद्दी मध्ये दि.१३ ऑगष्ट ते १५ ऑगष्ट दरम्यान भारत देश स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हर घर तिरंगा अभियान राबवणार आहे...

जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या नेवासा ते औरंगाबाद मोफत रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ

नेवासा/प्रतिनिधी श्री क्षेत्र नाणीज येथील जगदगुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या वतीने नेवासा फाटा येथे मोफत रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ मंगळवार दि.९ ऑगस्ट रोजी विधिवत...

पत्रकारिता अभ्यासक्रमात भाऊसाहेब कासार प्रथम तर रमेश खरबस द्वितीय

  माय महाराष्ट्र न्यूज:यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापिठाच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षेत शिक्षक भाऊसाहेब कासार हे प्रथम तर रमेश खरबस यांनी द्वितीय...

नागेबाबा मल्टीस्टेटच्या मयत सभासदाच्या वारसाला १० लाखाचा धनादेश प्रदान

राहुरी/प्रतिनिधी श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट सोसायटीच्या मयत सभासदाच्या वारसांना नागेबाबा सुरक्षा कवच योजनेअंतर्गत आज राहुरी येथे माजी मंत्री आ.प्राजक्त तनपुरे व शिवशाहीर विजय तनपुरे यांचे...

हनुमंतराय ही बुद्धी आणि शक्तीची देवता- स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज

माय महाराष्ट्र न्यूज: राहुल कोळसे:--  हनुमंतराय ही बुद्धी आणि शक्तीची देवता असल्याने प्रत्येकाने आपल्या जीवनात  हनुमंतरायांची मनोभावे सेवा केली पाहिजे असे प्रतिपादन श्री क्षेत्र...

यिन केंद्रीय कॅबिनेट सभापतीपदी दिव्या भोसले यांची वर्णी संपूर्ण राज्यातील युवकांमधून झाली निवड

मुंबई/प्रतिनिधी नुकत्याच झालेल्या यिन 'कॉनक्लेव २०२२' कार्यक्रमात भरघोस मताधिक्क्याने जळगावच्या दिव्या भोसले यांची यिन केंद्रीय कॅबिनेट सभापती म्हणून निवड करण्यात आली.राज्यातील लाखो युवकांनी दिव्या भोसले...
error: Content is protected !!