Wednesday, August 17, 2022

केशर आंब्यातून ऊसापेक्षा जास्त उत्पन्न मिळविणे शक्य-डॉ.कापसे

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

एक एकर फळबाग लागवडीसाठी एकरी 1.25 लाख रुपये लागवड खर्च येतो.केशर आंबा लागवड केल्यास तिसऱ्या वर्षी 2 टन तर चौथ्या वर्षांपासून 6 टन आंब्याचे 4 लाख 80 हजार रुपयांचे उत्पन्न मिळते.त्यामुळे
केशर आंबा लागवडीतून ऊसापेक्षा जास्त उत्पन्न मिळविणे शक्य असल्याचे प्रतिपादन आंबा पीक शास्रज्ञ डॉ.भगवानराव कापसे यांनी केले.

नेवासा तालुक्यातील रांजणगावदेवी येथे महाकेशर आंबा बागायतदार संघ व चैतन्य ॲग्रोव्हेट अण्ड रिसर्च फाऊंडेशन आयोजित आंबा लागवड ते निर्यात चर्चा सत्रात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतांना डॉ.कापसे बोलत होते.महाकेशर आंबा बागायतदार संघाचे अध्यक्ष नंदकुमार काळे हे चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी होते.संघाचे उपाध्यक्ष अंकुशराव कानडे,संचालक अशोकराव सूर्यवंशी,त्रिम्बक पाथरीकर,द्वारकदास पाथरीकर,अशोक पाटील, अहमदभाई चाऊस,मोहनराव बडधे,कॉ.बाबा आरगडे, गोरक्षनाथ कापसे, आप्पासाहेब वाबळे,विष्णू सावंत,भारत आरगडे आदी यावेळी उपस्थित होते.

डॉ.कापसे पुढे म्हणाले,आंब्यासाठी भारी,हलकी,मुरमाड जमीन चालते. मुरमाड जमिनीत लागवड करतांना काळ्या मातीने 50 टक्के तर भारी जमिनीत 50 टक्के मुरुमाने खड्डे
भरून घ्यावेत.जमिनीत 10 टक्के पेक्षा जास्त चुनखडी, 8.2 पेक्षा जास्त सामू असू नये. लागवडीसाठी कलम केलेले निरोगी दीड फूट उंचीची रोपे वापरावीत.दीड बाय चार मीटर अंतरावर उत्तर दक्षिण लागवड करावी.हवेचा झोत आणि बागेचे तपमान नियंत्रनासाठी शेताच्या चारही बाजूने हिरव्या झाडांची ताटी करावी. ठिबकद्वारे खते व पाणी दयावे.इतर फळ झाडा प्रमाणे पाण्याचा ताण पडल्याची चिन्हे आंब्याच्या झाडावर दिसून येत नाही,त्यामुळे उन्हाळ्यात झाडाच्या गरजेनुसार पाणी न दिल्यास पावसाळ्यानंतर आंब्याचे झाड वाळत असल्याचे लक्षात येते. त्यामुळे पाणी देण्याची योग्य काळजी घ्यावी.
आंब्याची एकरी 666 झाडे बसतात.एक एकरासाठी 14 ते 15 लाख लिटर पाणी लागते.लागवडी नंतर 3 ऱ्या वर्षी एकरी 2 टन पहिले उत्पन्न मिळते. तर चौथ्या वर्षांपासून एकरी 6 टन आंब्यातून 4 लाख 80 हजार रुपयांचे उत्पन्न मिळते. निर्यातीसाठी आंबा उतरविणे, पिकविणेव बाजार पेठेत वेळेत पोहचविण्याचे यांचे ही नियोजन केले पाहिजे.
महाकेशर आंबा बागायतदार संघाचे उपाध्यक्ष अंकुशराव कानडे यांनी आभार मानले.

 

ताज्या बातम्या

error: Content is protected !!