Wednesday, August 17, 2022

13 जुलैला होणार गट-गण आरक्षण सोडत

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद, पंचायत समित्यांची अंतिम गट आणि गण रचना प्रसिद्ध केल्यानंतर आता या गट आणि गणांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला असून नगर सह राज्यातील 25 जिल्हा परिषदा आणि 284 पंचायत समित्यांच्या गट आणि गणांच्या आरक्षणाची सोडत दि. 13 जुलै रोजी काढण्यात येणार आहे.

निवडणूक आयोगाने दि. 27 जूनला अंतिम प्रभाग रचना जाहीर केल्यानंतर सर्वांच्या नजरा जिल्हा परिषदांचे गट व पंचायत समित्यांच्या गणांची आरक्षण सोडती कडे लागल्या होत्या. कारण या आरक्षण सोडती नंतरच खऱ्या अर्थाने गट आणि गणांचे चित्र स्पष्ट होणार असून इच्छुकांना मोर्चे बांधणी आणि निवडणुकीची तयारी करणे सोपे जाणार आहे. त्यामुळे निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांसाठी ही आरक्षण सोडत अतिशय महत्वाची मानली जात आहे.

सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षण रद्द केलेले असल्याने ही आरक्षण सोडत अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला), सर्वसाधारण महिला यांच्या करिता जागा निश्चित करण्यासाठीच काढली जाणार आहे. आरक्षण सोडत कार्यक्रमानुसार जिल्हाधिकारी यांनी आरक्षण सोडतीची सूचना प्रसिद्ध करणे- दि. 7 जुलै, जिल्हा परिषद गटांची आरक्षण सोडत जिल्हाधिकारी कार्यालय येथे तर पंचायत समिती गणांची आरक्षण सोडत तहसील कार्यालय येथे दि. 13 जुलै रोजी काढणे, आरक्षण सोडतीनंतर प्रारूप अधिसूचना दि. 15 जुलै रोजी प्रसिद्ध करणे, त्यावर दि. 21 जुलै पर्यंत हरकती मागविणे. आरक्षण सोडतीचा अहवाल व प्राप्त हरकती यावर अभिप्राय जिल्हाधिकारी यांनी निवडणूक आयोगाकडे मान्यतेसाठी दि. 25 जुलै पर्यंत सादर करणे. त्यानंतर निवडणूक आयोगाकडून दि. 2 ऑगस्ट रोजी अंतिम आरक्षण शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येईल असे राज्य निवडणूक आयोगाने म्हटले आहे.

 

ताज्या बातम्या

error: Content is protected !!