Wednesday, August 17, 2022

अभंगवाणी कार्यक्रमाचे यंदाचे रौप्य महोत्सवी वर्ष

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:ख्यातनाम गायक राम विधाते व बजरंग विधाते यांचा आषाढी एकादशीनिमित्त आयोजित अभंगवाणी या भक्ती संगीताच्या कार्यक्रमाचे यंदाचे रौप्यमहोत्सवी वर्ष असून संभाजीनगर

येथील तापडीया नाट्य मंदिर येथे रविवार दि,10 जुलै रोजी रात्री 8-30 वाजता अभंगवाणी या कार्यक्रमाचे विशेष आयोजन विधाते बंधूंच्या वतीने करण्यात आले आहे, सद्गुरु संगीत विद्यालयाच्या माध्यमातून

विद्यार्थ्यांना वर्षभर ज्ञानदानाचे कार्य विधाते बंधू करत असतात,अभंगवाणी हा कार्यक्रम ते राज्यभर सादर करत असतात, आपल्या अध्यात्मिक श्रद्धेपोटी रसिक श्रोत्यांसाठी दर वर्षी अभंगवाणी हा कार्यक्रम विनाशुल्क (मोफत)आयोजित करत असतात,

 गेली चोवीस वर्ष हा भक्ती संगीताचा कार्यक्रम मोठ्या भक्तीभावाने व श्रद्धेने रसिक श्रोत्यांच्या उपस्थितीने विधाते बंधू हे मोठ्या उत्साहाने साजरे करत असतात,कला-साहित्य- सामाजिक-सांस्कृतिक-आध्यात्मिक राजकीय-प्रशासकीय क्षेत्रातील

मान्यवरांची मोठी उपस्थिती या कार्यक्रमास असते, राम विधाते हे मान्यवर संत रचनांचा समावेश करत जसे की संत तुकाराम महाराज,संत ज्ञानेश्वर महाराज,संत निळा महाराज,

संत नामदेव महाराज, या महाराष्ट्रीयन संतांच्या संत रचनांचा या कार्यक्रमांमध्ये सहभाग असतो, लोकप्रिय रचनां बरोबरच स्वतः स्वरबद्ध केलेल्या रचनांचा ह्या कार्यक्रमात समावेश असतो,भारतीय पारंपरिक वाद्यांचा सुरेल मेळ, आकर्षक असे रंग मंच,

प्रकाश योजना,ध्वनी संयोजन यामुळे दरवर्षी या कार्यक्रमास उत्तरोत्तर रसीकांची पसंती असते, रविवार दि,10 जुलै रोजी रात्री 8-30 वाजता संभाजीनगर येथील तापडिया नाट्य मंदिरात

होणाऱ्या कार्यक्रमाचा सर्व रसीक श्रोत्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!