वर्धा/प्रतिनिधी
विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूर आणि मुंबई अर्थशास्त्र व सार्वजनिक धोरण संस्था,(स्वायत्त) मुंबई विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने निम्न वर्धा प्रकल्प अंतर्गत दि. ०५ जुलै रोजी वितरीकास्तरीय पाणी वापर संस्था बाबत कार्यशाळा संपन्न झाली.
वर्धा येथील सामाजिक न्याय भवन, सांस्कृतिक सभागृहात झालेल्या या कार्यशाळेकरीता प्रमुख वक्ते व मार्गदर्शक म्हणुन इंजि. लक्ष्मीकांत वाघवकर व इंजि. हनुमंत देशमुख ,वाघाड प्रकल्प (नाशिक) ,मुंबई विद्यापीठाचे डॉ.गणेश बडे
आदि मान्यवर उपस्थित होते.निम्न वर्धा प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता आर.पी. वऱ्हाडे कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी होते.
प्रथम मान्यवरांचे हस्ते दीप प्रज्वलित करुन कार्यशाळेचे उद्घाटन झाले.निम्न वर्धा प्रकल्पस्तरीय समन्वयक प्रकल्प आर.आर.पठाण यांनी प्रास्तविक केले.कार्यशाळेचे प्रथम सत्र सुरु होणे पूर्वी समाज परिवर्तन केंद्रातर्फे स्व.बापूसाहेब उपाध्ये यांचे जन्म शताब्दी वर्षानिमित्ताने प्रकाशित केलेली स्मरणिका लक्ष्मीकांत वाघवकर व हनुमंत देशमुख यांनी वराडे,डॉ.बढे व श्री.पठाण यांना भेट म्हणून देण्यात आली.
प्रमुख वक्ते श्री.लक्ष्मीकांत वाघवकर यांनी म.सिं.प.शे.व्य.कायदा २००५ अंतर्गत वितरीकास्तरीय पाणी वापर संस्था स्थापन करण्याची प्रक्रिया विषयी मार्गदर्शन केले.यामध्ये त्यांनी सक्षम झालेल्या लघु वितरीकास्तरीय पाणी वापर संस्थेची संख्या ५०%पेक्षा कमी नसावी,अशा वेळी आपण वितरीकास्तरीय पाणी वापर संस्था स्थापन करु शकतो, असे स्पष्ट केले. तसेच या करीता वित्तीय , प्रशासकीय व कार्यात्मक मानकांची आवश्यक पूर्तताचे करणेबाबतच्या तपशिलाचे आपल्या सत्रात मार्गदर्शन केले.शेवटी सर्वांनी कायदा व नियमांचे वाचन करुन निम्न वर्धा प्रकल्पातील अभियंते,पाणी वापर संस्था व मुंबई विद्यापीठ यांनी पाणी वापर संस्था सक्षम व आत्मनिर्भर होणेसाठी एकमेकांचे समन्वयाने काम करण्याचे आवाहन केले.उपस्थितांना वाघाड प्रकल्पाची यशोगाथा दाखवण्यात आली.
श्री. हनुमंत देशमुख यांनी वितरीकास्तरीय पाणी वापर संस्थे संदर्भात जलसंपदा विभागाची जबाबदारी व तांत्रिक बाबी संदर्भात सविस्तर असे मार्गदर्शन केले.
दुपारच्या सत्रात डॉ.गणेश बडे यांनी वितरीका स्तरीय पाणी वापर संस्था गठीत करण्याची प्रक्रिया मुं.अ.सा.धो.सं.मुबंई विद्यापीठ यांची भूमिका यावर प्रकाश टाकला.तसेच सहभागी सिंचन पद्धती यावर सविस्तर स्वरुपात मार्गदर्शन केले.
सहायक अभियंता श्रेणी (१) श्री.गाडे यांनी विभाग व पाणी वापर संस्था यांच्यातील सहसंबंध आणि समन्वय या बाबत आपली भूमिका मांडली.
चर्चा सत्र कार्यक्रम मध्ये उपस्थित मुंबई विद्यापीठ अधिकारी/कर्मचारी व निम्न वर्धा प्रकल्पाचे सर्व अभियंता यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे प्रमुख मान्यवर यांनी देऊन शंकाचे निरासन केले.
कार्यशाळेचे अध्यक्ष कार्यकारी अभियंता श्री.आर.पी. वऱ्हाडे यांनी पाणी वापर संस्था संदर्भात विभागाची भूमिका स्पष्ट केली व प्रत्येक अभियंत्याने एक संस्था दत्तक घेऊन संस्था कार्यक्षम करावी असे उदिष्ट दिले.तसेच निम्न वर्धा प्रकल्पातील सर्व पाणी वापर संस्था व अभियंत्यांना म.सिं.प.शे.व्य.अधिनियम २००५व नियम २००६ च्या पुस्तिका उपलब्ध करुन देण्याचेही वऱ्हाडे यांनी याप्रसंगी सांगितले .
निम्न वर्धा प्रकल्पातील सर्व उपविभागीय अभियंता, शाखाअभियंता,कनिष्ठ अभियंता, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक,संबंधित लिपिक तसेच निम्न वर्धा प्रकल्पाचे मुंबई विद्यापीठाचे अधिकारी-कर्मचारी व गोसीखुर्द प्रकल्पातील मुंबई विद्यापीठाचे काही अधिकारी-कर्मचारी देखील उपस्थित होते.तसेच अभियांत्रिकी महाविद्यालयातील काही विद्यार्थी यांची देखील सदर कार्यशाळेस उपस्थिती होती.
प्रकल्पस्तरीय समन्वयक आर .आर पठाण यांनी सूत्रसंचालन केले.वरिष्ठ समूह समन्वयक विनेश काकडे यांनी कार्यशाळेचा समारोप केला.