Thursday, August 11, 2022

रस्तालुट करणारे दरोडेखोर नेवासा पोलिसांनी केले जेरबंद

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

रोडवर वाहने आडवून रोड रॉबरी करणारे चोरांना नेवासा पोलिसांनी सापळा जेरबंद केले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की,दि. 07 रोजी रात्रगस्त करीता पोनि विजय करे, पोनायक बबन तमनर, पोकॉ अंबादास गिते, पोकों नारायण डमाळे चालक पोकॉ दिलप कु-हाडे असे सर्वांनी औरंगाबाद ते अहमदनगर रोडवर वाहने आडवून रोड रॉबरी करणारे चोरांना पकडण्यासाठी सापळा लावला. औरंगाबाद ते अहमदनगर या महामार्गावरुन फिरत असताना असताना, त्यावेळी एक महिंद्रा पिकअप गाडी होमधील पाचजण यांनी माळीचिचोरा फाटा येथे मालवाहतूक ट्रक वाहन ने एमएच 6 एवाय 7254 हीचा रॉड तुटल्याने गाडी रोडचे बाजूला लावून लावून उभा होता. त्यावेळी नेवासा पोलीस ठाण्याची नाईट राउंडची गाडी तेथे गेलो असता त्यास रात्री काही अडचण आल्यास त्यास संपर्क करण्यासाठी नेवासा पोस्टेचे पोलोस अंमलदार यांचा नंबर देण्यात आला होता. त्यांनतर पहाटे ठिक 03.30 वाचे दरम्यान नमुद ट्रक मधील चालक हा माळीचिचोरा फाटा येथे गाडीतील ड्रायव्हरने गाडीच्या दोन्ही काचा बंद करून झोपलेला असताना त्याचे गाडीच्या दोन्ही काचा फोडून व लॉक तोडून दोन इसम यात आले. तेव्हा गाडील डावे बाजूने आत आलेल्या इसमाने ड्रायव्हर यास पैसे दे नाही, तर तुला कोयत्याने मारतो असे म्हणून कोयता पुढे केला. तेव्हा त्याचे अंगात काळे रंगाचे जॅकेट होते. उजव्या बाजूने आत आलेल्या इसमाने चालक यास कोयताने मारले असता चालक याने हात पाठीमागे केल्याने त्यास कोयता निसटता लागला. तेव्हा दोघांनी त्यास मारहाण करून त्याचे खिशातील पाकीटातील 8000/- रूपये काढून घेतले व रिकामे पाकोट गाडीत फेकून दिले व ते बाजूस उभा असलेल्या पिकअप मध्ये बसून निघून गेले तेव्हा चालकाने पाहोले असता सदर महींद्रा पिकअप मध्ये आणखी तीन जण बसलेले होते तेव्हा चालक याने नेवासा पोलीसांनी संपकांसाठी दिलेल्या मोबाईल फोनवर सपर्क केला असता तेथे रात्रगस्त करत असताना पोनि करे, पोना बबन तमनर, पोको अंबादास गिते, पोको नारायणा डमाळे चापोकों दिलप कु-हाडे असे रात्रगस्तचे पोलीस अधिकारी व कर्मचारी असे सदर ट्रक चालक यास सोबत घेवून त्यास लुटणारे पिकअप व इसम यांचा शोध घेत असता नेवासा फाटा येथे चालक याने त्यास लुटणारे इसम व त्याचे कडील पिकअप गाडी ओळखली असता तेथे आम्ही पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच सदर चालक असे आम्ही नमूद पिकअप जवळ गेलो असता पोलीसांना पाहून काळया रंगाचे जकांग घातलेले तिन इसम अंधाराचा फायदा घेवून शेतात पळून गेले व दोन इसम यांनी पिकअप गाडी घेवून पळ काढला त्यांनंतर आम्हो पोलीसांनी त्याचा पाठलाग सुरू केला तेव्हा झाले प्रकाराबाबत पोसई समाधान भाटेवाल सो पोना राजू केदार पोको बाळू खेडकर, पोकों योगश आव्हाड, पोकों शाम गुंजाळ LCBचे पाहेको दत्तात्रय गव्हाणे पोकों ज्ञानेश्वर शिंदे असे नेवासा फाटा येथे आले व त्यांनंतर सर्व पोलीस स्टाफ यांनी त्याचा अ नगर ते औरंगाबाद रोडवर 40 ते 50 किलोमिटर पाठलाग केला असता ह्युंदाई शोरूम समोर त्याचे कडील पिकअप गाडी पकडली असता त्यात कोयता दाखवून पाकटातील पैसे काढणारा इसम व त्याचे सोबत अनोळखी एक इसम मिळाला तेव्हा पो नि श्री करे सो यांनी त्यास त्याचे नाव गाव विचारता पाकीट काढणारे इसमाने त्याचे नाव त्रूतीक संजय जाधव व दुस-याने दिपक उर्फ कटटा बाळासाहेब काळे दोघे रा देहरे ता नगर जि अ नगर असे असल्याचे सांगितले त्यांनतर पोलीसांनी त्यांची महींद्रा पिकअप नं एमएच20डीई 2337 ची झडती घेतली असता त्याचे गाडीत ट्रक चालक यास दाखवण्यात आलेला कोयत्या सारखे हत्यार व दोन मोबाईल मिळून आले तेव्हा त्या दोन्ही इसमांना तसेच त्याचे कडील गाडी हत्यारासह ताब्यात घेवून पो स्टेला आलो व वरील पाच इसम याचे विरुध्द कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा पुढील तपास पोउपनि श्री. समाधान भाटेवाल हे करीत आहेत,

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विजय करे, उपनिरीक्षक समाधान भाटेवाल, पोना बबन तमनर, पोना राजू केदार, पोको अंबादास गिते, पोको नारायण डमाळे, चालक पोको दिलीप कु-हाडे, पोकों बाळू खेडकर, पोकों योगेश आव्हाड, पोको शाम गुंजाळ सर्व नेमणुक पोलीस ठाणे नेवासा व स्थानिक गुन्हे शाखा याकडील पोहेका दत्तात्रय गव्हाणे पोको ज्ञानेश्वर शिंदे यांनी संयुक्तपणे केली आहे.

 

ताज्या बातम्या

भेंडा बुद्रुक ग्रामपंचायत हर घर तिरंगा अभियान राबविणार-सरपंच प्रा.उषा मिसाळ

नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक ग्रामपंचायत हद्दी मध्ये दि.१३ ऑगष्ट ते १५ ऑगष्ट दरम्यान भारत देश स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हर घर तिरंगा अभियान राबवणार आहे...

जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या नेवासा ते औरंगाबाद मोफत रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ

नेवासा/प्रतिनिधी श्री क्षेत्र नाणीज येथील जगदगुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या वतीने नेवासा फाटा येथे मोफत रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ मंगळवार दि.९ ऑगस्ट रोजी विधिवत...

पत्रकारिता अभ्यासक्रमात भाऊसाहेब कासार प्रथम तर रमेश खरबस द्वितीय

  माय महाराष्ट्र न्यूज:यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापिठाच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षेत शिक्षक भाऊसाहेब कासार हे प्रथम तर रमेश खरबस यांनी द्वितीय...

नागेबाबा मल्टीस्टेटच्या मयत सभासदाच्या वारसाला १० लाखाचा धनादेश प्रदान

राहुरी/प्रतिनिधी श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट सोसायटीच्या मयत सभासदाच्या वारसांना नागेबाबा सुरक्षा कवच योजनेअंतर्गत आज राहुरी येथे माजी मंत्री आ.प्राजक्त तनपुरे व शिवशाहीर विजय तनपुरे यांचे...

हनुमंतराय ही बुद्धी आणि शक्तीची देवता- स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज

माय महाराष्ट्र न्यूज: राहुल कोळसे:--  हनुमंतराय ही बुद्धी आणि शक्तीची देवता असल्याने प्रत्येकाने आपल्या जीवनात  हनुमंतरायांची मनोभावे सेवा केली पाहिजे असे प्रतिपादन श्री क्षेत्र...

यिन केंद्रीय कॅबिनेट सभापतीपदी दिव्या भोसले यांची वर्णी संपूर्ण राज्यातील युवकांमधून झाली निवड

मुंबई/प्रतिनिधी नुकत्याच झालेल्या यिन 'कॉनक्लेव २०२२' कार्यक्रमात भरघोस मताधिक्क्याने जळगावच्या दिव्या भोसले यांची यिन केंद्रीय कॅबिनेट सभापती म्हणून निवड करण्यात आली.राज्यातील लाखो युवकांनी दिव्या भोसले...
error: Content is protected !!