माय महाराष्ट्र न्यूज: राहुल कोळसे: महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी हा कांदा पिकाला भाव नसल्यामुळे अडचणीत सापडला आहे. कवडीमोल भावाने कांदा हा शेतकऱ्यांना विकावा लागत आहे .
त्यामुळे शेतकऱ्यांना कांदा पिकवण्यासाठी आलेला खर्च ही त्यामधून निघत नाही. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव हे मदतीला आले आहे. महाराष्ट्रातील काही ठिकाणचा कांदा हा आता तेलंगणा राज्यातील व्यापारी घेत आहे .
तसेच चांगला दरही मिळत आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू बघायला मिळत आहे.दरम्यान याच विषयावर भारत राष्ट्र समितीचे समन्वयक बी.जे देशमुख यांनी सांगितले आहे की शेतकऱ्यांचा कांदा बाजारात आल्यानंतर कांद्याच्या दरात घसरण झाली आहे.
शेतकरी देशोधडीला लागलेला आहे याकडे सत्ताधारी व विरोधकांचे लक्ष नाही. भारत राष्ट्र समितीचे नेते माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी व इतर नेत्यांनी कांदा दराबाबत चौकशी केली तर हैदराबाद मध्ये साधारण कांदा 1700 – 1800 प्रतिक्विंटल भाव मिळत आहे.
तर महाराष्ट्रात 300 – 400 रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे. हेच गांभीर घेऊन तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव व त्यांच्या सहकार्यांना विनंती केली व त्यांनी या गोष्टीला सकारात्मक दृष्टीने बघून त्यांचे व्यापारी महाराष्ट्रात पाठवून येथील काही कांदा खरेदी केला आहे.
यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम तेलंगणा सरकारने केला आहे. ज्या महाराष्ट्रात शंभर लाख मॅट्रिक टन कांद्याचे उत्पादन होते. महाराष्ट्रातील शेतकरी देशोधडीला लागलेला असताना महाराष्ट्रातील सरकार उदासीन भूमिकेतून त्याच्याकडे बघत आहे.
त्यामुळे येत्या काळात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी भारत राष्ट्र समितीच्या मागे उभा राहिले पाहिजे असे देशमुख यांनी सांगितले आहे.