माय महाराष्ट्र न्यूज :-महाराष्ट्र राज्यातील राजकारणात कधी नव्हे ती एेतिहासिक घटना घडली आहे,गेल्या अडीच वर्षापासुन महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार होते आणि महाराष्ट्र
राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे होते,परंतु शिवसेना पक्षात अंतर्गत मतभेद होऊन शिवसेना नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वात आमदारांच्या एका
गटाने भाजपा सोबत हातमिळवणी करून सरकार स्थापन केले आहे,महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेब यांनी पदभार स्वीकारला आहे,परंतु केंद्र सरकार व भाजपा पक्षाचे दलाल किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री एकनाथ
शिंदे साहेब यांचे अभिनंदन करताना शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे यांचा माफिया मुख्यमंत्री असा उल्लेख करून महाराष्ट्रातील समस्त शिवसैनिकांना वेदना देणारे वक्तव्य केले आहे.
किरीट सोमय्या हे केंद्र सरकार व भाजपाच्या तालावर चालणारी व्यक्ती आहे,जेव्हापासुन महाराष्ट्र राज्यात भाजपा सत्तेतून पायउतार झाली,तेव्हापासुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे,युवासेनाप्रमुख
आदित्य ठाकरे,शिवसेना पक्षातील नेते, आमदार,खासदार यांच्यावर केंद्र सरकार व भाजपाच्या सांगण्यावरून सुडबुद्धीने बिनबुडाचे आरोप करून महाराष्ट्र राज्याची देशपातळीवर बदनामी करत होते,परंतु
गेल्या काही दिवसापासुन राज्यातील राजकारणाने अचानकपणे वेगळे वळण घेऊन महाराष्ट्र राज्यात शिवसेना पक्षाच्या काही आमदारांनी वेगळा गट करून भाजप सोबत सत्ता स्थापन केली आहे.
तेव्हापासुन केंद्र सरकार व भाजपाचे दलाल किरीट सोमय्या हे भाजपा सोबत जे आमदार सत्तेत सहभागी झाले आहेत त्यांच्यावर कोणतेही आरोप करताना किंवा बोलताना दिसत नाहीत,यापुर्वी किरीट सोमय्या यांनी नारायण राणे,विजय गावित,बबनराव पाचपुते,कृपाशंकर सिंह,
प्रताप सरनाईक,यामिनी जाधव यांच्यावर आरोप केले पण ते आज भाजपा सोबत सत्तेत सहभागी झाल्यामुळे त्यांच्यावर बोलत नाहीत,त्यांच्यावरील आरोपांचे पुढे काय झाले हे महाराष्ट्रातील जनतेला सांगावे मगच बोलावे आणि शिवसेना पक्षप्रमुख
तथा माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे,युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर पातळी सोडून गेली अडीच वर्ष सुडबुद्धीने बिनबुडाचे आरोप करीत आहेत,केंद्र सरकार व भाजपाचे दलाल किरीट सोमय्या
यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्यावर बोलण्या अगोदर स्वत:ची लायकी पहावी,मगच बोलावे यापुढे जर शिवसेना पक्षप्रमुख उद्ववजी ठाकरे,युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे,शिवसेना नेते,
आमदार,खासदार यांच्यावर जर सुडबुद्धीने बिनबुडाचे आरोप केले तर किरीट सोमय्या यांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिले जाईल अशा इशारा ॲड.कानिफ कानतोडे यांनी प्रसिद्धीपत्राकाद्वारे किरीट सोमय्या यांना दिला आहे.