Thursday, August 11, 2022

नगर ब्रेकिंग:मोठा अपघात:दोघांचा मृत्यू, ३ गंभीर जखमी

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात भीषण अपघात झाला आहे. उंबरे येथे माळवाडी शिवारात काल, शुक्रवारी

रात्री सातेसात वाजता राहुरी-शनिशिंगणापूर रस्त्यावर एका भरधाव कारने पाच जणांना उडविले. यात दोघांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे तर, तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.संजय उर्फ सांडू

अर्जुन हिवराळे (वय ३२) व कैलास छबुराव पंडित (वय ४५) (दोघेही रा.माळवाडी, उंबरे) या दोघांचा मृत्यू झाला आहे. तर सुरेश झुगाजी ससाणे, सोन्याबापू बाबासाहेब गायकवाड, बादशहा शेख

(तिघेही रा . माळवाडी, उंबरे) अशी गंभीर जखमींची नांवे आहेत.शनिशिंगणापूरच्या दिशेने कार क्र एमएच ०९ बीएक्स ३६१६ भरधाव वेगाने चालली होती. मोलमजुरी करुन उपजिविका

करणारे सुरेश ससाणे रस्त्याने पायी चालले होते. त्यांना कारने जोरदार धडक दिली. कार चालकाने जखमीला मदत न करता भरधाव वेगाने कार शनिशिंगणापूरच्या दिशेने नेली. पुढे एक किलोमीटर

अंतरावर दोन दुचाकींना कारने जोरदार धडक दिली .बांधकाम मजुरी करणारे चार जण दुचाकींवर होते.दरम्यान, भरधाव कारने पुढे एका ओढ्यावरील पुलाला धडक दिली. त्यामुळे कार

तेथेच सोडून कारमधील लोकांनी पलायन केले. कारमधील तीन जण पळाल्याचे स्थानिकांनी सांगितले.राहुरी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी राहुरी पोलिस ठाण्यात

अज्ञात कार चालकाविरुद्ध भरधाव वाहन चालवून रस्ता अपघातास व मृत्यूस कारणीभूत झाल्याचा गुन्हा नोंदविण्याचे काम सुरु आहे.

ताज्या बातम्या

भेंडा बुद्रुक ग्रामपंचायत हर घर तिरंगा अभियान राबविणार-सरपंच प्रा.उषा मिसाळ

नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक ग्रामपंचायत हद्दी मध्ये दि.१३ ऑगष्ट ते १५ ऑगष्ट दरम्यान भारत देश स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हर घर तिरंगा अभियान राबवणार आहे...

जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या नेवासा ते औरंगाबाद मोफत रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ

नेवासा/प्रतिनिधी श्री क्षेत्र नाणीज येथील जगदगुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या वतीने नेवासा फाटा येथे मोफत रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ मंगळवार दि.९ ऑगस्ट रोजी विधिवत...

पत्रकारिता अभ्यासक्रमात भाऊसाहेब कासार प्रथम तर रमेश खरबस द्वितीय

  माय महाराष्ट्र न्यूज:यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापिठाच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षेत शिक्षक भाऊसाहेब कासार हे प्रथम तर रमेश खरबस यांनी द्वितीय...

नागेबाबा मल्टीस्टेटच्या मयत सभासदाच्या वारसाला १० लाखाचा धनादेश प्रदान

राहुरी/प्रतिनिधी श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट सोसायटीच्या मयत सभासदाच्या वारसांना नागेबाबा सुरक्षा कवच योजनेअंतर्गत आज राहुरी येथे माजी मंत्री आ.प्राजक्त तनपुरे व शिवशाहीर विजय तनपुरे यांचे...

हनुमंतराय ही बुद्धी आणि शक्तीची देवता- स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज

माय महाराष्ट्र न्यूज: राहुल कोळसे:--  हनुमंतराय ही बुद्धी आणि शक्तीची देवता असल्याने प्रत्येकाने आपल्या जीवनात  हनुमंतरायांची मनोभावे सेवा केली पाहिजे असे प्रतिपादन श्री क्षेत्र...

यिन केंद्रीय कॅबिनेट सभापतीपदी दिव्या भोसले यांची वर्णी संपूर्ण राज्यातील युवकांमधून झाली निवड

मुंबई/प्रतिनिधी नुकत्याच झालेल्या यिन 'कॉनक्लेव २०२२' कार्यक्रमात भरघोस मताधिक्क्याने जळगावच्या दिव्या भोसले यांची यिन केंद्रीय कॅबिनेट सभापती म्हणून निवड करण्यात आली.राज्यातील लाखो युवकांनी दिव्या भोसले...
error: Content is protected !!