Wednesday, August 17, 2022

नगर जिल्हा हादरला:पतीने केला पत्नीचा खून

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी रेल्वे स्टेशन येथे आज (शनिवारी) वैदूवाडी शिवारात पतीने पत्नीचा गळा आवळून खून केला.

उज्ज्वला इंद्रजित जाधव (वय २२, रा. राहुरी रेल्वे स्टेशन) असे मृत महिलेचे नाव आहे. राहुरी पोलिसांनी पतीला ताब्यात घेतले आहे. मृताच्या आईच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिस ठाण्यात

रात्री उशिरापर्यंत आरोपी पतीविरुद्ध गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.आरोपी इंद्रजित जाधव याने, आज (शनिवारी) सकाळी साडेआठ वाजता पत्नी उज्ज्वला हिने गळफास घेऊन

आत्महत्या केल्याचा बनाव केला. मृत उज्ज्वला गळ्याला ओढणी बांधून घरातील पत्र्याच्या लोखंडी अँगलला लटकलेल्या अवस्थेत होत्या. खासगी रुग्णवाहिकेला बोलावून पत्नीला दवाखान्यात

नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिस ठाण्याला कळविल्याशिवाय मृतदेह हलविण्यास रुग्णवाहिकाचालकाने नकार दिला.आज (शनिवारी) सकाळी साडेअकरा वाजता राहुरी

पोलिसांना माहिती समजली. पोलिस उपनिरीक्षक नीरज बोकील व परिविक्षाधीन उपनिरीक्षक ज्योती डोके यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाची बारकाईने पाहणी

केल्यावर पोलिसांना संशय आला. मृतदेहाच्या गळ्याला जखम असल्याचे दिसले. पोलिसांनी आरोपी जाधवला ताब्यात घेतले. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हलविण्यात आला.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!