Wednesday, August 17, 2022

उद्या सोनईत या मला आपल्याशी बोलायचं: माजी मंत्री गडाख ;मोठा निर्णय घेण्याची शक्यता?

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:माजी मंत्री आणि आमदार शंकरराव गडाख यांनी ‘ मला आपल्याशी बोलायचयं ‘ या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेशी

संवाद साधण्याचे ठरवले आहे. सोमवारी 11 जुलै रोजी सकाळी साडे नऊ वाजता अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील मुळा पब्लिक स्कूल ,सोनई येथे सर्व

कार्यकर्त्यांना आणि जनतेला निमंत्रित केले आहे. तशा प्रकारे निमंत्रण त्यांनी जाहीररीत्या सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेला आणि कार्यकर्त्यांना पाठवले आहे.या ठिकाणी ते जनतेशी

प्रत्यक्ष संवाद साधत मनातील भावना व्यक्त करणार आहेत.नक्की त्यांच्या मनात चाललंय काय याचा उलगडा 11 तारखेला होईलच.पण गेल्या काही दिवसांपासून नेवासा मतदार संघात अनेक

घटना घडल्या आहेत.त्याचे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष आरोप शंकरराव गडाख आणि गडाख कुटुंबियांवर झाले होते पण त्यावेळी त्यांनी अत्यंत शांत आणि संयमी भूमिका घेतली होती.त्याविषयीही ते

आता परखडपणे बोलतील असे कार्यकर्त्यांना अपेक्षित आहे.त्याचप्रमाणे राज्यात सुरू असणाऱ्या राजकीय घडामोडी आणि त्याबाबत आणि पुढील राजकीय धोरण म्हणून गडाख काय भूमिका जाहीर करतात

याकडे जिल्ह्याचेच नव्हे तर राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.महाविकास आघाडी सरकार येत असताना शंकरराव गडाख यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दिला होता. गडाख

यांनी नेवासा विधानसभेची निवडणूक अपक्ष लढवून भाजपाचे उमेदवार बाळासाहेब मुरकुटे यांचा पराभव करून मोठा विजय मिळवला होता. शिवसेनेला पाठिंबा दिल्यानंतर महाविकास

आघाडीचे सरकार आले आणि शंकराव गडाख यांना जलसंधारण मंत्री पदही मिळाले काम केले परंतु महाविकास आघाडी सरकारला पायउतार व्हावे लागले . दरम्यान पुढील जिल्हा

परिषद व पंचायत समिती निवडणुकीची रणनीती काय व तालुक्याचे राजकारण याविषयी गडाख भाष्य करण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!