माय महाराष्ट्र न्यूज:राष्ट्रवादीच्या मेळाव्यात अजित पवारांनी शरद पवारांकडे मागणी केली आहे. मला विरोधी पक्षनेते पदावरून मुक्त करा. असं म्हटलं आहे.
सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांना कार्याध्यक्ष म्हणून घोषित केल्यानंतर अजित पवारांनी आपली खदखद स्पष्टपणे बोलून दाखवली आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार आणि इतर नेत्यांच्या उपस्थितीत
अजित दादांनी आपल्याला संघटनेत पद देण्याची मागणी केली आहे.’संघटनेत आपल्याला कुठलेही पद दिले तरी आपल्याला हरकत नाही. तरी हा निर्णय पक्ष नेतृत्वाचा आहे,’ या शब्दांत अजित पवारांनी शरद पवारांसमोर
एकप्रकारे कार्याध्यक्ष निवडीवरून आपली नाराजी बोलून दाखवली आहे. मुंबईत सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रम सुरु असून त्या कार्यक्रमात अजित दादा बोलत होते.
पुढे ते म्हणाले, “आपण आनंदाचा दिवस साजरा करत असताना चिंतन करायला हवं. आपण भकरी फिरवायची ठरवली आहे तर ती फिरलीच पाहिजे. २५ वर्ष माझ्या मनाला दुःख आहे. ममता बॅनर्जी एकट्याच्या जीवावर
पश्चिम बंगाल घेऊ शकतात, केजरीवाल दोन राज्य आणतात, बीआरएस एकट्याच्या बळावर सत्ता आणते मग या सर्वांत तर पवार साहेब उजवे नेते आहेत ना? आपल्याला आत्मचिंतन, आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे.
आपण कुठे कमी पडलो याचा विचार केला पाहिजे.अजित पवार यांनी कार्यकर्त्यांचे देखील कान टोचले. “आपण आपल्या एकट्याच्या ताकदीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यात सत्तेवर निवडून येऊ शकलेला नाहीय. यासाठी आपणच कुठेतरी कमी पडलो आहोत.
आपण विदर्भामध्ये कमी पडतो. आपण मुंबईत कमी पडतो. मुंबईत आजदेखील काय अवस्था आहे? आपण 25 वर्षे पूर्ण करुन 26 व्या वर्षात पदार्पण केलंय. पण अजूनही मुंबईचा अध्यक्ष नाहीय. आपल्याला दिल्लीला कुणाला विचारायला जायचंय?”, असा सवाल त्यांनी केला.
आपल्याला निर्णय तर महाराष्ट्रातच घ्यायचाय. इथे आपल्या राष्ट्रवादी भवनमध्ये घ्यायचा आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि इतर मान्यवरांशी चर्चा करायची आहे. काय आपण कमी पडलो? कशामुळे कमी पडलो? कोकणात, पश्चिम
महाराष्ट्रात आपण वर्चस्व निर्माण केलं. उत्तर महाराष्ट्रातही आपण चांगलं यश मिळवलं. आपण आज आनंदाचा दिवस साजरा करत असताना थोडं पाठीमागे वळून आत्मचिंतन करण्याची गरज आहे”, असं मत अजित पवार यांनी मांडलं.