Wednesday, August 17, 2022

पुरुषांप्रमाणेच महिला वर्गातही लैंगिक क्षमता वाढविणाऱ्या औषधांची क्रेझ ?

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:लैंगिकता, लैंगिक शिक्षण, लैंगिक समस्या आदी विषयांवर उघड चर्चा करणे आपल्याकडे अजूनही सभ्यतेचे लक्षण मानले जात नाही.

अशी चर्चा करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांकडे संशयित नजरेने पाहिले जाते. त्यामुळे यासंदर्भातील ज्ञान-अज्ञान यांच्यातील सीमारेषा धूसर राहात असते. परिणामी पुरेशा ज्ञानाअभावी अनेकांना

लैंगिक समस्यांना सामोरे जावे लागले. लैंगिक क्षमता उत्तम म्हणजे पौरुषत्व असा खासा समज असतो. त्यामुळे आपले हे पौरुषत्व अबाधित राहावे किंबहुना अधिक वृद्धिंगत व्हावे, यासाठी

लैंगिक शक्तिवर्धक गोळ्यांचा आधार घेतला जातो. मात्र, अशा गोळ्या-औषधांची खरंच गरज असते का, हे तपासून पाहणे आवश्यक ठरते.उत्तर प्रदेशातील एका तरुणाचा नुकताच विवाह झाला होता.

मित्रांच्या सल्ल्यावरून त्याने लैंगिक क्षमता वाढविणारी औषधे घेतली. मात्र, त्याचे दुष्परिणाम झाल्याने संबंधित तरुणावर तातडीची शस्त्रक्रिया करावी लागली. तर गेल्या आठवड्यात

कामोत्तेजक औषधे घेऊन संभोग करणे एका तरुणाच्या जीवावर बेतले. नागपुरात ही घटना घडली. सद्यस्थितीत बाजारात लैंगिक क्षमता वाढविणाऱ्या औषधांनी हैदोस घातला आहे.

नामांकित औषध कंपन्या विविध नावाने ही औषधे बाजारात आणत आहेत. अनेक कंपन्यांच्या जाहिरातीही एवढ्या कल्पक असतात की पाहणाऱ्याला वाटावे की हे औषध जणू आपल्यासाठीच बनवले आहे.

त्यातही लैंगिक क्षमता वाढविणाऱ्या या गोळ्या-औषधांच्या विक्रीवर कोणाचेही नियंत्रण नाही. कुणीही यावे आणि औषध घेऊन जावे, अशी परिस्थिती आहे.पुरुषांप्रमाणेच महिला वर्गातही लैंगिक

क्षमता वाढविणाऱ्या औषधांची क्रेझ आहे. ही औषधे घेण्यामध्ये महिला पुढाकार घेऊ लागल्या आहेत. पुरुषांमध्ये लैंगिक ताठरता आणि शीघ्र पतनाच्या लैंगिक तक्रारी असतात तद्वत

महिलांमध्येही लैंगिक तक्रारी असतात. कामेच्छा कमी असणे, कामतृप्ती न होणे, अशा काही समस्या महिलांमध्ये आढळून येतात. औषधे घेताना डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

– डाॅ. विजय दहिफळे, लैंगिक तज्ज्ञ

ताज्या बातम्या

error: Content is protected !!