Thursday, August 11, 2022

माजी मंत्री प्राजक्त तनपुरेंची शंका खरी ठरली ? अन् महाविकास आघाडी सरकार…

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:राहुरी येथील पांडुरंग लॉन्स व मंगल कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. या प्रसंगी

माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी राज्यातील सत्ता परिवर्तनावर भाष्य करताना, ‘चार वर्षांत महाविकास आघाडी सरकार कोसळेल याची शंका होती,’ असे सांगितले.

त्यांचे हे वक्तव्य चर्चेचा विषय ठरत आहे.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गंगाधर जाधव होते. प्राजक्त तनपुरे म्हणाले की, मी राज्यातील घटनाक्रमानंतर पहिल्यांदाच मतदार संघात आलो.

पावसाचे वातावरण असतानाही कार्यकर्ते मोठ्या संख्येने उत्साहात जमले होते. मंत्रीपद गेल्याने कार्यकर्त्यांत खेद आहे. त्यांच्या भावना मी समजू शकतो. मंत्रीपदाच्या माध्यमातून अडीच

वर्षे राज्यभर कारत असताना मतदार संघातही कोट्यावधी रुपयांची विकासकामे आणली आहेत. जरी मी आता विरोधी पक्षातील आमदार असलो तरी मतदारसंघात पुढे अडीच वर्षांतही

विकासकामांना खिळ बसणार नाही. त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करून मतदार विकास थांबणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.ते पुढे म्हणाले की, मतदार संघातील विकासकामे

ज्या गतीने सुरू आहेत. त्याच गतीने ती विकासकामे सुरू राहतील. एवढे दिवस सत्ताधारी पक्षाचा मंत्री म्हणून मला विधानसभेत प्रश्नांना केवळ उत्तरेच देण्याची जबाबदारी होती. मात्र आता

जनतेचे प्रश्न घेऊन सत्ताधाऱ्यांवर प्रश्नाचा भडीमार करण्याची संधी मिळेल. याचा मला आनंद आहे, असा इशाराही त्यांनी यावेळी विरोधकांना दिला.राहुरी विधानसभा निवडणुकीपूर्वी मी खचलो होतो.

आमदारकी मिळेल याची खात्री नव्हती परंतु अर्ज भरताना मला जो प्रतिसाद तोच माझ्यासाठी महत्त्वाचा ठरला. देवाकडे केवळ आमदार व्हावे अशी प्रार्थना केली होती मात्र देवाने आमदारकी बरोबरच

नामदारकीही दिली. सहा खात्यांचे मंत्रीपद संभाळताना शिवसेनेचे तत्कालीन मंत्री एकनाथ शिंदे व उदय सामंत यांनी मोठे सहकार्य केले. काँग्रेसकडून अपेक्षीत सहकार्य लाभले नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

कधीही आमदार अथवा खासदारकीचा अनुभव नसलेले शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. त्यांनी कोरोनासारखा कालखंड हाताळला. राज्यातील जनतेचे प्राण वाचविले. पदाचा

गर्व न बाळगता ते वारत होते. त्यांना बंडखोरांनी सोडून जाणे त्यांच्या जिव्हारी लागले आहे. राष्ट्रवादीच्या आमदारांना पवार कुटुंबीयांचे पाठबळ आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला बळकटी देण्यासाठी

जोमाने काम करणार असे त्यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

भेंडा बुद्रुक ग्रामपंचायत हर घर तिरंगा अभियान राबविणार-सरपंच प्रा.उषा मिसाळ

नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक ग्रामपंचायत हद्दी मध्ये दि.१३ ऑगष्ट ते १५ ऑगष्ट दरम्यान भारत देश स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हर घर तिरंगा अभियान राबवणार आहे...

जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या नेवासा ते औरंगाबाद मोफत रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ

नेवासा/प्रतिनिधी श्री क्षेत्र नाणीज येथील जगदगुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या वतीने नेवासा फाटा येथे मोफत रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ मंगळवार दि.९ ऑगस्ट रोजी विधिवत...

पत्रकारिता अभ्यासक्रमात भाऊसाहेब कासार प्रथम तर रमेश खरबस द्वितीय

  माय महाराष्ट्र न्यूज:यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापिठाच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षेत शिक्षक भाऊसाहेब कासार हे प्रथम तर रमेश खरबस यांनी द्वितीय...

नागेबाबा मल्टीस्टेटच्या मयत सभासदाच्या वारसाला १० लाखाचा धनादेश प्रदान

राहुरी/प्रतिनिधी श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट सोसायटीच्या मयत सभासदाच्या वारसांना नागेबाबा सुरक्षा कवच योजनेअंतर्गत आज राहुरी येथे माजी मंत्री आ.प्राजक्त तनपुरे व शिवशाहीर विजय तनपुरे यांचे...

हनुमंतराय ही बुद्धी आणि शक्तीची देवता- स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज

माय महाराष्ट्र न्यूज: राहुल कोळसे:--  हनुमंतराय ही बुद्धी आणि शक्तीची देवता असल्याने प्रत्येकाने आपल्या जीवनात  हनुमंतरायांची मनोभावे सेवा केली पाहिजे असे प्रतिपादन श्री क्षेत्र...

यिन केंद्रीय कॅबिनेट सभापतीपदी दिव्या भोसले यांची वर्णी संपूर्ण राज्यातील युवकांमधून झाली निवड

मुंबई/प्रतिनिधी नुकत्याच झालेल्या यिन 'कॉनक्लेव २०२२' कार्यक्रमात भरघोस मताधिक्क्याने जळगावच्या दिव्या भोसले यांची यिन केंद्रीय कॅबिनेट सभापती म्हणून निवड करण्यात आली.राज्यातील लाखो युवकांनी दिव्या भोसले...
error: Content is protected !!