Thursday, August 11, 2022

लग्नाआधीच गरोदर होती ही अभिनेत्री ? 

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट मागच्या काही दिवसांपासून तिच्या प्रेग्नन्सीच्या वृत्तामुळे चर्चेत आहे. आलियानं लग्नानंतर

अवघ्या काही महिन्यांतच प्रेग्नन्सीची गुडन्यूज दिल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. अनेकदा अभिनेत्री करिअरला ब्रेक लागू नये यासाठी लग्नानंतर लगेचच प्रेग्नन्सीचा

निर्णय घेणं टाळतात मात्र आलियानं असं केलं नाही. त्यामुळे ती लग्नाआधीच प्रेग्नंट होती की काय अशा चर्चा सोशल मीडियावर सुरू झाल्या होत्या. अशात करण जोहरच्या एका मुलाखतीमुळे

आता आलिया खरंच लग्नाआधी प्रेग्नंट होती असं बोललं जात आहे.आलिया भट्टनं अलिकडेच करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी तिने करण जोहरनं

तिच्या लग्नाची बातमी जेव्हा त्याला दिली तेव्हा त्याची काय प्रतिक्रिया होती हे सांगितलं. आलिया म्हणाली, “मी जेव्हा त्याला माझ्या लग्नाबाबत सांगायला त्याच्या ऑफिसमध्ये गेले होते. तेव्हा

त्याचा ‘बॅड हेअर डे’ होता. त्याचे केस सेट होत नव्हते आणि तो वैतागलेल्या अवस्थेत डोक्याला हेअर कॅप लावून बसला होता. मी त्याला सगळं काही सांगून झाल्यावर लग्न करणार असल्याच्या

निर्णयाबद्दल सांगितलं. तेव्हा त्याच्या डोळ्यात पाणी आलं. एका हातात कॉफीचा कप घेतलेला करण जोहर माझ्या लग्नाची बातमी ऐकून अक्षरशः रडत होता.आलियानं तिच्या लग्नाबाबत

सांगितलेला हा किस्सा करण जोहरच्या काही दिवसांपूर्वीच्याच एका मुलाखतीशी फार मिळता जुळता आहे. जेव्हा आलियानं प्रेग्नन्सीची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली, त्यानंतर

करणने एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्याने आलियाच्या प्रेग्नन्सीची बातमी समजल्यानंतर काय प्रतिक्रिया होती हे स्पष्ट करताना हाच ‘बॅड हेअर डे’चा किस्सा सांगितला होता.करण म्हणाला

होता, “मला आठवतंय त्या दिवशी माझा ‘बॅड हेअर डे’ होता. मी कॅप लावून, हूडी घालून बसलो होतो आणि आलिया माझ्या ऑफिसमध्ये आली होती. तिने मला तिच्या प्रेग्नन्सीविषयी सांगितलं आणि माझी

पहिली प्रतिक्रिया ही होती की माझ्या डोळ्यात पाणी आलं. ज्या मुलीला मी माझं बाळं मानतो, तिचं बाळं या जगात येणार असल्याची वेगळाच आनंद होता.” करणच्या या प्रतिक्रियेचा संदर्भ

आलियाच्या लग्नाच्या किस्स्याशी जोडून आलिया लग्नाआधीच प्रेग्नंट होती असं बोललं जात आहे.

ताज्या बातम्या

भेंडा बुद्रुक ग्रामपंचायत हर घर तिरंगा अभियान राबविणार-सरपंच प्रा.उषा मिसाळ

नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक ग्रामपंचायत हद्दी मध्ये दि.१३ ऑगष्ट ते १५ ऑगष्ट दरम्यान भारत देश स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हर घर तिरंगा अभियान राबवणार आहे...

जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या नेवासा ते औरंगाबाद मोफत रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ

नेवासा/प्रतिनिधी श्री क्षेत्र नाणीज येथील जगदगुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या वतीने नेवासा फाटा येथे मोफत रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ मंगळवार दि.९ ऑगस्ट रोजी विधिवत...

पत्रकारिता अभ्यासक्रमात भाऊसाहेब कासार प्रथम तर रमेश खरबस द्वितीय

  माय महाराष्ट्र न्यूज:यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापिठाच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षेत शिक्षक भाऊसाहेब कासार हे प्रथम तर रमेश खरबस यांनी द्वितीय...

नागेबाबा मल्टीस्टेटच्या मयत सभासदाच्या वारसाला १० लाखाचा धनादेश प्रदान

राहुरी/प्रतिनिधी श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट सोसायटीच्या मयत सभासदाच्या वारसांना नागेबाबा सुरक्षा कवच योजनेअंतर्गत आज राहुरी येथे माजी मंत्री आ.प्राजक्त तनपुरे व शिवशाहीर विजय तनपुरे यांचे...

हनुमंतराय ही बुद्धी आणि शक्तीची देवता- स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज

माय महाराष्ट्र न्यूज: राहुल कोळसे:--  हनुमंतराय ही बुद्धी आणि शक्तीची देवता असल्याने प्रत्येकाने आपल्या जीवनात  हनुमंतरायांची मनोभावे सेवा केली पाहिजे असे प्रतिपादन श्री क्षेत्र...

यिन केंद्रीय कॅबिनेट सभापतीपदी दिव्या भोसले यांची वर्णी संपूर्ण राज्यातील युवकांमधून झाली निवड

मुंबई/प्रतिनिधी नुकत्याच झालेल्या यिन 'कॉनक्लेव २०२२' कार्यक्रमात भरघोस मताधिक्क्याने जळगावच्या दिव्या भोसले यांची यिन केंद्रीय कॅबिनेट सभापती म्हणून निवड करण्यात आली.राज्यातील लाखो युवकांनी दिव्या भोसले...
error: Content is protected !!