Thursday, August 11, 2022

बाभुळखेडा येथे कृषिकन्यांकडून कृषी सप्ताह उत्साहात साजरा…….

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

भेंडा – (प्रतिनिधी ): माय महाराष्ट्र न्यूज नेवासा तालुक्यातील बाभुळखेडा येथे सोनई कृषी महाविद्यालयातील कृषिकन्यांनी विविध उपक्रम घेऊन कृषि सप्ताह आनंदपूर्ण वातावरणात पार पाडला.

वृक्षदिंडी, चित्रकला स्पर्धा,वृक्ष संवर्धन व ग्रामस्वच्छता असे वेगवेगळे उपक्रम राबवले.   यावेळी कृषि शास्त्रज्ञ डॉ.अशोकराव ढगे यांनी शेतीचे पंचसूत्र म्हणजेच जमिनीचे आरोग्य,पाणी व्यवस्थापन,खत

व्यवस्थापन, बीज प्रक्रिया आणि कीडीचा बंदोबस्त याविषयी मार्गदर्शन करून शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केली. तसेच कृषिकन्यांनी हुमणी अळीच्या नियंत्रणाबद्दल मार्गदर्शन केले. यावेळी

कृषि सप्ताहाच्या झालेल्या कार्यक्रम प्रसंगी मंडळ कृषि अधिकारी मनोज सूर्यवंशी हे अध्यक्षस्थानी होते. तसेच कृषि सहाय्यक दांडगे व श्री तवले उपस्थित होते.

या कार्यक्रमाला सरपंच ज्ञानेश्वर औतडे,उपसरपंच नारायण विधाटे, जि.प.प्रा शाळेचे मुख्याध्यापक फासगे सर,ससे मॅडम व इतर शेतकरी उपस्थित होते.सोनई महाविद्यालयाच्या प्रा.शुब्धा पलगडमल,

प्रा प्रियदर्शनी जाधव, प्रा श्रीकृष्ण हुरुळे हे उपस्थित होते. सोनई कृषिमहाविद्यालयाच्या कृषिकन्या साक्षी कोळसे, आंधळे ऋतुजा,रसिका चिने,आव्हाड दिपाली,धांडे प्रतीक्षा, गायकवाड ऋतुजा यांनी कार्यक्रम पार पाडला.

ताज्या बातम्या

भेंडा बुद्रुक ग्रामपंचायत हर घर तिरंगा अभियान राबविणार-सरपंच प्रा.उषा मिसाळ

नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक ग्रामपंचायत हद्दी मध्ये दि.१३ ऑगष्ट ते १५ ऑगष्ट दरम्यान भारत देश स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हर घर तिरंगा अभियान राबवणार आहे...

जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या नेवासा ते औरंगाबाद मोफत रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ

नेवासा/प्रतिनिधी श्री क्षेत्र नाणीज येथील जगदगुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या वतीने नेवासा फाटा येथे मोफत रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ मंगळवार दि.९ ऑगस्ट रोजी विधिवत...

पत्रकारिता अभ्यासक्रमात भाऊसाहेब कासार प्रथम तर रमेश खरबस द्वितीय

  माय महाराष्ट्र न्यूज:यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापिठाच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षेत शिक्षक भाऊसाहेब कासार हे प्रथम तर रमेश खरबस यांनी द्वितीय...

नागेबाबा मल्टीस्टेटच्या मयत सभासदाच्या वारसाला १० लाखाचा धनादेश प्रदान

राहुरी/प्रतिनिधी श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट सोसायटीच्या मयत सभासदाच्या वारसांना नागेबाबा सुरक्षा कवच योजनेअंतर्गत आज राहुरी येथे माजी मंत्री आ.प्राजक्त तनपुरे व शिवशाहीर विजय तनपुरे यांचे...

हनुमंतराय ही बुद्धी आणि शक्तीची देवता- स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज

माय महाराष्ट्र न्यूज: राहुल कोळसे:--  हनुमंतराय ही बुद्धी आणि शक्तीची देवता असल्याने प्रत्येकाने आपल्या जीवनात  हनुमंतरायांची मनोभावे सेवा केली पाहिजे असे प्रतिपादन श्री क्षेत्र...

यिन केंद्रीय कॅबिनेट सभापतीपदी दिव्या भोसले यांची वर्णी संपूर्ण राज्यातील युवकांमधून झाली निवड

मुंबई/प्रतिनिधी नुकत्याच झालेल्या यिन 'कॉनक्लेव २०२२' कार्यक्रमात भरघोस मताधिक्क्याने जळगावच्या दिव्या भोसले यांची यिन केंद्रीय कॅबिनेट सभापती म्हणून निवड करण्यात आली.राज्यातील लाखो युवकांनी दिव्या भोसले...
error: Content is protected !!