Thursday, August 11, 2022

आपत्तीपासून बचाव करण्यासाठी घ्यावयाची काळजी

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

अहमदनगर

राज्यात मान्सून कालावधीत वीज पडणे / वज्राघात होणे याचे प्रमाणे अधिक असल्याने जिवित व वित्तहानी होत असते. ही एक नैसर्गिक आपत्ती असून जिवित हानी व वित्तीय हानी टाळण्याच्या दृष्टीने काय उपाययोजना करण्यात याव्यात याबाबत राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी राज्यासाठी मार्गदर्शक सूचना प्रसिध्द केल्या आहेत.

नागरीकांनी अशा आपत्तीपासून बचाव करण्याच्या दृष्टीने काय करावे व काय करु नये याबाबतच्या जनजागृतीविषयक मार्गदर्शक सूचना तसेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी नागरी पूर आपत्ती प्रसंगी पूर्वतयारी व प्रतिबंधक उपाययोजनांबाबतही सूचना दिल्या आहेत.

या मार्गदर्शक सूचना नागरिकांच्या माहितीसाठी……
*वज्राघात-काय करावे व काय करु नये*
मान्सून काळात अति वेगवान वारे, अति पर्जन्य आणि काळ ढग, घोंघावणारे गडगडाटी वादळ, जवळचे झंझावत, जास्त किंवा अधिक जास्त प्रमाणात मेघगर्जना ही चेतावणी समजून घेणे महत्वाचे असते. वीजबाबतही  सतर्क राहणे आवश्यक असते. वीज ही सामान्यपणे उंच वस्तुंवर पडते. कोणतेही स्थान हे पूर्णपणे सुरक्षित नाही परंतू  काही स्थान इतर ठिकाणांपेक्षा सुरक्षित आहेत. मोठी बांधकामे छोट्या किंवा खुल्या बांधकामापेक्षा जास्त सुरक्षित असतात. जास्त पाऊस पडणा-या क्षेत्राच्या बाहेरही वज्रघात होऊ शकतो  वज्रघात सतत एकाच ठिकाणी होऊ शकतो. सामान्यत: बाहेर पडलेल्या व्यक्तीच वज्रघातामुळे जखमी किंवा मृत्यू पावतात. वज्राघात बाधीत जखमी व्यक्तिस तुम्ही मदत करु शकता परंतु  त्याच्या शरिरात कुठल्याही प्रकारचा विद्युत प्रवाह सुरु नसावा. त्या व्यक्तीस तात्काळ/त्वरीत मदत करणे आवश्यक असते
वज्राघात काय करावे.
वज्राघातापासून बचावासाठी भित्तीचित्रे, भितीपत्रके प्रदर्शित करा. आपल्या भागातील स्थानिक हवामानाविषयी अंदाजाची व सतर्कतेच्या माहितीचे निरीक्षण करा. स्वत:साठी व कुटुंबासाठी वज्राघाताच्या आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय सेवेसंदर्भात तसेच स्थानिक प्रशासकीय यंत्रणेसंदर्भात संपर्क करण्यासाठीचा आराखडा तयार करा.वैद्यकीय व स्थानिक आपात्कालीन सेवांचे संपर्क तपशील तयार करणे. आपत्कालीन साधने तयार ठेवा. जर गडगडाटी वादळाची, अतिवेगाने वाहणा-या वादळी वा-यांचा अंदाज असेल तर घराबाहेरील क्रिया पुढे ढकलणे. विजेवर चालणा-या वस्तु, इलेक्ट्रीक व इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि वातानुकुलीत  यंत्रे बंद ठेवावे. आपल्या घराच्या आजूबाजूच्या वाळलेले झाडे किंवा मृत झाडे फांद्या काढून टाकणे.

*तुमच्या परिसरात वादळी वारे (गडगडाटी वारे) वीजा चमकत असल्यास काय करावे.*
आपण घरात असल्यास घराच्या खिडक्या व दरवाजे बंद ठेवा. घराच्या दरवाजे, खिडक्या, कुंपणा पासून दूर रहा. मेघगर्जना झाल्यापासून 30 मिनिटे घराच्या आतच रहावे. आपण घराबाहेर असल्यास त्वरित सुरक्षित निवा-याच्या ठिकाणाकडे (मजबूत इमारतीकडे) प्रस्थान करावे. ट्रॅक्टरर्स, शेतीची अवजारे, मोटरसायकल, सायकल यांच्या पासून दूर रहा. गाडी चालवत असल्यास, सुरक्षित स्थळी जाण्याचा प्रयत्न करावे व गाडी सुरक्षित ठिकाणी लावतांना मोठ्या झाडांपासून तसेच पुराचे पाणी येत असल्यास अशी ठिकाणी वगळून लावव्यात.खुल्या ठिकाणांपेक्षा सामान्यत: खिडक्या बंद असलेल्या, धातू पासून तयार झालेली  वाहने (बस, मोटार) चांगली आश्रय स्थळे होऊ शकतात. उघडयावर असल्यास, शेवटचा पर्याय म्हणून लगेच गुडघ्यावर बसून हाताने आपले कान झाकने व आपले डोके दोन्ही गुडघ्यांच्यामध्ये झाकावे. जमीनीशी कमीत कमी संपर्क असावा. मोकळया तसेच लटकत्या विद्युत तारांपासून दूर रहा. जंगलामध्ये, दाट, लहान झाडांखाली, उताराच्या जागेवर निवारा घ्यावा. इतर खुल्या जागेवर : नदीसारख्या खोल जागेवर जाण्याचा प्रयत्न करा  जर जमीनीच्या वर पाणी आल्यास ताबडतोब सुरक्षित निवारा शोधून काढा.
वीज पडल्यास/ वज्राघात झाल्यास काय करावे :– त्वरीत रुग्णवाहीका व वैद्यकीय मदत बोलवा. वज्राघात बाधित व्यक्तीस त्वरीत वैद्यकीय मदत मिळवून द्या. त्याला हात लावण्यास धोका नाही. ओल्या व थंड परिस्थितीत, इजळाला ( बाधित व्यक्ती) व जमिनीच्या मध्ये संरक्षणात्मक थर ठेवावा. जेणे करुन हायपोथरमीयाचा ( शरिराचे अती कमी तापमान) धोका कमी होईल.
खालील प्रमाणे इजा झालेल्या इसमास हाताळा :

श्वसन बंद असल्यास: तोंडावाटे पुनरुत्थान प्रक्रिया अवलंबावी.
हृदयाचे ठोके बंद असल्यास : कुठलीही वैद्यकीय मदत मिळेपर्यंत रुग्णाची हृदय गती  CPR चा वापर करुन सुरु ठेवा.
इजाळाची, रुग्णाचा श्वास व नाडी सुरु असल्यास : इतर दुखापतीसाठी/आघातांसाठी तपासणे (भाजणे/ऐकू न येणे/ न दिसणे)

वादळीवारे (गडगडाटी वारे) वीजा चमकत असल्यास काय करु नये
गडगडाटीचे वादळ असल्यास, उंच जागांवर, टेकडीवर, मोकळया जागांवर, समुद्र किनारी, स्वतंत्र झाड, रेल्वे/बस/सहलीची आश्रय स्थाने, दळणवळणाची टॉवर्स, ध्वजाचे खांब, विद्युत/ दिव्यांचे खांब, धातूचे कुंपण, उघडी  वाहने आणि पाणी इत्यादी  टाळावे.
आपण घरात असल्यास :- वायरव्दारे जोडले गेलेले फोन/मोबाईल व इतर इलेक्ट्रीक उपकरणे विद्युत जोडणीस लावू नये. (अशा आपत्कालीनवेळी कॉडलेस व वायरलेस फोनचा वापर करावा परंतु ते भिंतीला जोडलेले नसावे) गडगडीच्या वादळादरम्यान व वीजा चमकतांना कोणत्याही विद्युत उपकराणंचा वापर करु नका. या दरम्यान आंघोळ करणे, हात धूणे, भांडी धूणे, कपडे धूणे ही कार्ये करु नयेत. काँक्रीटच्या (ठोस) जमिनीवर  झोपू नये किंवा उभे राहू नये. प्रवाहक्रीय पृष्ठभागांशी संपर्क टाळावा. (धातूची दारे, खिडक्याची तावदाने, वायरींग व प्लंबींग/ नळ)
 आपण घराबाहेर असल्यास :- मेघगर्जनाच्या वेळी चमकत असतांना किंवा वादळीवारे वाहत असतांना झाडाखाडी किंवा झाडांजवळ उभे राहू नये. वाहनांच्या धातू किंवा वीजेच्या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा. अधांतरी लटकणा-या / लोंबणा-या केबल्स पासून लांब रहा.

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, भारत सरकार, नवी दिल्ली यांच्या नागरी, शहरी पूर आपत्ती प्रसंगी पूर्वतयारी व प्रतिबंध उपाययोजनाबाबत मार्गदर्शक सूचना –
प्रत्येक राज्यांमध्ये उच्चतम पूर पातळी ठरविणे. प्रत्येक शहरांमध्ये तांत्रिकदृष्ट्या सक्षम समन्वय अधिका-यासह नागरी पूर/पूर व्यवस्थापन यंत्रणा स्थापित करणे. प्रत्येक शहराने खालील परिस्थिती विचारात घेऊन नागरी पूर व्यवस्थापन आणि उपक्षमन यासाठी प्रमाणित कार्यपध्दती (SOP) लागू करावी. किनारावर्ती शहरे. मुख्य/मोठया नदी किना-यावरील शहरे. धरणांजवळील/ जलाशयांजवळील शहरे. अंतर्गत शहरे. डोगराळ प्रदेशातील शहरे,शहरांना वरीलप्रमाणे एक किंवा अनेक वैशिष्ट्ये असून शकतात. नागरी पूर व्यवस्थापनासाठी सर्व भागीदारीची क्षमता बांधणी व उत्तम समन्वयासाठी मान्सूनपूर्व कार्यशाळेचे आयोजन करणे. मान्सुनचे आगमन होण्याच्या ब-याच कालावधीपूर्वी शहरातील जलाशयांच्या पाण्याचे शुध्दीकरण तसेच गटारांमधील गाळ प्रभावीपणे काढण्याची कार्यवाही पूर्ण करणे. प्रत्येक शहरातील पाण्याच्या साठ्यांच्या स्थितीचे व मालकीहक्काचे सूचीकरण व मॅपिंग करणे. शहरातील पूर परिस्थितीजन्य भागातील पाण्याचा उपसा करण्यासाठी पंप बसविणे. विमानतळ असणा-या शहराच्या समन्वय अधिका-याने पावसाच्या सद्यस्थिती व भाकितासंबंधीच्या स्थितीबरोबरच चक्रीवादळ व अतिवृष्टीची माहिती भारतीय हवामान विभागाकडून (LMD) घेणे आवश्यक आहे. ही माहिती METARS या संस्थेकडून दर 30 मिनिटांनी अद्यावत करण्यात येते. जेव्हा चक्रीवादळ  व अतिवृष्टीची स्थिती असते. तेव्हा ही माहिती महानगरपालिकेच्या आयुक्तांना तातडीने कळविणे गरजचे असते. जेणे करुन ते सावधानता बाळगून त्यावर प्रतिबंधक उपाययोजना करतील. उदा. पूरग्रस्त व अतिवृष्टी क्षेत्रातील शाळा बंद करणे.
जलाशयातून, धरणातून पाण्याचा विसर्ग करण्याचा निर्णय जागेवर घेण्याच्या दृष्टीने प्रत्येक शहरासाठी पुरेसे अधिकार असणा-या उच्च स्तरीय तज्ञ समितीची स्थापना करणे. या समितीला अतिवृष्टीच्यावेळी पाण्याच्या विसर्गाच्या भाकिताचा आढावा घेऊन जलशयाची / धरणाची दारे उघडून पाण्याचा विसर्ग करण्याचे अंतिम अधिकार राहील. जलाशयातून, धरणातून पाण्याचा विसर्ग केला असता शेजारील राज्यांना ती माहिती त्याच वेळी देणे . प्रत्येक राज्य/ जिल्हा प्राधिकरणाने धोका नकाशा तयार करणे गरजचे आहे. जेणेकरुन उपलब्ध साधनांचा पुरेपूर वापर करता येईल. पुराच्या मुख्य कारणांमध्ये अतिवृष्टी व बर्फ वितळणे यांचा समावेश होतो. त्यामुळे बर्फ वितळणे ढगफुटीमुळे उध्दवणा-या परिस्थितीत धरणातून केला जाणारा पाण्याचा विसर्ग यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. आपत्तीच्या परिस्थितीचा पूर्वानूमान बांधून आपत्तीमध्ये लागणा-या मूलभूत बाबी म्हणजे पाणी पुरवठा अन्नपुरवठा, वैद्यकीय सोयी. स्वच्छतेच्या सोयी इत्यादीची माहिती प्रशासनाने संग्रहित करुन ठेवणे गरजचे आहे. जेणेकरुन आपत्तीच्यावेळी मदत पोहोचविणे सहज शक्य होईल. आपत्ती संबंधातील माहिती त्याचवेळी मिळण्यासाठी राज्याने पूरनियंत्रण सॉफ्टवेअर विकसित करणे. राज्य शासनाने प्रत्येक जिल्हयाला आपत्ती सरावासाठी 1 लाख रुपये राखून ठेवणे राज्याचे या निधीचा विनियोग विचारपूर्वक पध्दतीने करणे. आपत्तीमध्ये काय करावे व काय करु नये याबाबतची माहिती जाहिरातीव्दारे स्थानिक भाषेत प्रसिध्दी देणे. प्रशासनाने पुराच्या अंदाजासाठी केंद्रीय जल आयोगाच्या संपर्कात रहाणे. किनारपट्टीच्या भागामध्ये RCC छत नसलेल्या घरांच्या सुरक्षेसाठी U आकाराच्या गळाचा (Hook’s)वापर करणे. झाडांची नियमित छाटणी योग्य प्रकारे होत की नाही तसेच जनजागृतीचे, जाहिरातीचे फलक सुस्थितीत आहेत की नाही याची खात्री करणे आवश्यक आहे. अशा प्रकारे काळजी व उपाययोजना करणे महत्वाचे असते.

    संकलन-डॉ. रवींद्र ठाकुर,
जिल्हा माहिती अधिकारी, अहमदनगर

ताज्या बातम्या

भेंडा बुद्रुक ग्रामपंचायत हर घर तिरंगा अभियान राबविणार-सरपंच प्रा.उषा मिसाळ

नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक ग्रामपंचायत हद्दी मध्ये दि.१३ ऑगष्ट ते १५ ऑगष्ट दरम्यान भारत देश स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हर घर तिरंगा अभियान राबवणार आहे...

जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या नेवासा ते औरंगाबाद मोफत रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ

नेवासा/प्रतिनिधी श्री क्षेत्र नाणीज येथील जगदगुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या वतीने नेवासा फाटा येथे मोफत रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ मंगळवार दि.९ ऑगस्ट रोजी विधिवत...

पत्रकारिता अभ्यासक्रमात भाऊसाहेब कासार प्रथम तर रमेश खरबस द्वितीय

  माय महाराष्ट्र न्यूज:यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापिठाच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षेत शिक्षक भाऊसाहेब कासार हे प्रथम तर रमेश खरबस यांनी द्वितीय...

नागेबाबा मल्टीस्टेटच्या मयत सभासदाच्या वारसाला १० लाखाचा धनादेश प्रदान

राहुरी/प्रतिनिधी श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट सोसायटीच्या मयत सभासदाच्या वारसांना नागेबाबा सुरक्षा कवच योजनेअंतर्गत आज राहुरी येथे माजी मंत्री आ.प्राजक्त तनपुरे व शिवशाहीर विजय तनपुरे यांचे...

हनुमंतराय ही बुद्धी आणि शक्तीची देवता- स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज

माय महाराष्ट्र न्यूज: राहुल कोळसे:--  हनुमंतराय ही बुद्धी आणि शक्तीची देवता असल्याने प्रत्येकाने आपल्या जीवनात  हनुमंतरायांची मनोभावे सेवा केली पाहिजे असे प्रतिपादन श्री क्षेत्र...

यिन केंद्रीय कॅबिनेट सभापतीपदी दिव्या भोसले यांची वर्णी संपूर्ण राज्यातील युवकांमधून झाली निवड

मुंबई/प्रतिनिधी नुकत्याच झालेल्या यिन 'कॉनक्लेव २०२२' कार्यक्रमात भरघोस मताधिक्क्याने जळगावच्या दिव्या भोसले यांची यिन केंद्रीय कॅबिनेट सभापती म्हणून निवड करण्यात आली.राज्यातील लाखो युवकांनी दिव्या भोसले...
error: Content is protected !!