Wednesday, August 17, 2022

‘पीएम किसान’ योजना ऑनलाईन ‘केवायसी’ करण्याची मुदत ३१ जूलै पर्यंत

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

अहमदनगर, दि.१८ जूलै

‘पीएम किसान’ योजनेचा लाभ घेत असलेल्या ; मात्र अद्याप ‘केवायसी’ (ग्राहकाची ओळख) न केलेल्या शेतकऱ्यांनी ३१ जूलै २०२२ पर्यंत ‘केवायसी’ ऑनलाईन करून घ्यावी. अन्यथा ‘केवायसी’ अभावी या योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागू शकते. असे आवाहन ‘पीएम किसान’ योजनेचे जिल्हा समन्वयक अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) पोर्टलवरील नोंदणीकृत पात्र लाभार्थ्याची ऑनलाईन’केवायसी’ करण्यासाठी विशेष जनजागृती मोहीम ‘मे २०२२’ पर्यंत राबविण्यात आली. या मोहीमेस ३१ जूलै २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र अद्यापही जिल्ह्यातील ४१.११ टक्के लाभार्थ्याची ‘केवायसी’ प्रक्रिया पूर्ण झालेली नाही.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) https://pmkisan.gov.in या संकेतस्थळावरील फॉर्मर कॉर्नर (Farmer Corner) या टॅब मध्ये किंवा ‘पीएम किसान’ अॅपमध्ये ओटीपी द्वारे लाभार्थीना स्वतः केवायसी प्रमाणीकरण मोफत करता येईल. ‘ग्राहक सेवा केंद्रा’वर १५ रूपयांच्या नाममात्र शुल्कात ‘केवायसी’ बायोमॅट्रिक पद्धतीने करता येईल. असे आवाहनही श्री.निचित यांनी केले आहे.

 

ताज्या बातम्या

error: Content is protected !!