Thursday, August 11, 2022

कृषी विक्री परवान्यांसाठी ३१ जूलै २०२२ पर्यंतच ऑनलाईन नोंदणी 

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

अहमदनगर, 18 जुलै

खते, बियाणे आणि किटकनाशके यांच्या विक्रीचे परवाने प्राप्त करून घेण्यासाठी जिल्ह्यातील कृषी विक्रेत्यांनी ‘महाआयटी’ च्या ‘आपले सरकार’ पोर्टलवर ३१ जूलै २०२२ पर्यंत ऑनलाईन नोंदणी करावी. असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजी श्रीरंग जगताप यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

जिल्ह्यातील कृषि विक्रेत्यांना खते, बियाणे आणि किटकनाशके विक्रीचे डिजीटल स्वाक्षरी असलेले परवाने प्राप्त करण्यासाठी यापुढे नवीन ऑनलाईन प्रणाली विकसित झालेली आहे. सदरचे परवाने जून्या प्रणालीमधून देण्याचे बंद करण्यात आलेले आहे. परवान्याचे नूतनीकरण आणि सुधारणा  या बाबीही नवीन परवाना ‘प्रणालीमधूनच करावयाची आहेत. तरी सद्यस्थितीमध्ये ज्या विक्रेत्यांचे वैध असलेले परवाने आणि वैधता संपलेले परवाने अशा सर्व विक्रेत्यांनी आपले परवान्यांची ‘आपले सरकार’ या पोर्टलवर (https://aaplesarkar.mahaonline.gov.in/) ऑनलाईन नोंदणी करावी.

या प्रक्रियेत विक्रेत्यांना घरबसल्या नोंदणी करुन परवाना प्राप्त करुन घेता येणे शक्य होणार आहे. मात्र यासाठी परवाना धारकांना त्यांचा सद्यस्थितीतील वैध परवाना नवीन प्रणालीवर कार्यान्वित करावा लागणार आहे. ज्या विक्रेत्यांच्या परवान्याची मुदत ३१ जूलै च्या पुढे आहे त्यांनी देखील या नव्याने विकसित झालेल्या ऑनलाईन प्रणालीवर आपला परवाना अद्ययावत करावयाचा आहे. परवाना अद्ययावत करण्यासाठी कोणतेही वेगळे शूल्क भरण्याची गरज नाही. तसे न केल्यास आपला सद्यस्थितीतील परवाना रद्द समजण्यात येईल आणि त्यावर नियमानुसार योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. असे आवाहन श्री.जगताप यांनी या प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

ताज्या बातम्या

भेंडा बुद्रुक ग्रामपंचायत हर घर तिरंगा अभियान राबविणार-सरपंच प्रा.उषा मिसाळ

नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक ग्रामपंचायत हद्दी मध्ये दि.१३ ऑगष्ट ते १५ ऑगष्ट दरम्यान भारत देश स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हर घर तिरंगा अभियान राबवणार आहे...

जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या नेवासा ते औरंगाबाद मोफत रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ

नेवासा/प्रतिनिधी श्री क्षेत्र नाणीज येथील जगदगुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या वतीने नेवासा फाटा येथे मोफत रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ मंगळवार दि.९ ऑगस्ट रोजी विधिवत...

पत्रकारिता अभ्यासक्रमात भाऊसाहेब कासार प्रथम तर रमेश खरबस द्वितीय

  माय महाराष्ट्र न्यूज:यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापिठाच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षेत शिक्षक भाऊसाहेब कासार हे प्रथम तर रमेश खरबस यांनी द्वितीय...

नागेबाबा मल्टीस्टेटच्या मयत सभासदाच्या वारसाला १० लाखाचा धनादेश प्रदान

राहुरी/प्रतिनिधी श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट सोसायटीच्या मयत सभासदाच्या वारसांना नागेबाबा सुरक्षा कवच योजनेअंतर्गत आज राहुरी येथे माजी मंत्री आ.प्राजक्त तनपुरे व शिवशाहीर विजय तनपुरे यांचे...

हनुमंतराय ही बुद्धी आणि शक्तीची देवता- स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज

माय महाराष्ट्र न्यूज: राहुल कोळसे:--  हनुमंतराय ही बुद्धी आणि शक्तीची देवता असल्याने प्रत्येकाने आपल्या जीवनात  हनुमंतरायांची मनोभावे सेवा केली पाहिजे असे प्रतिपादन श्री क्षेत्र...

यिन केंद्रीय कॅबिनेट सभापतीपदी दिव्या भोसले यांची वर्णी संपूर्ण राज्यातील युवकांमधून झाली निवड

मुंबई/प्रतिनिधी नुकत्याच झालेल्या यिन 'कॉनक्लेव २०२२' कार्यक्रमात भरघोस मताधिक्क्याने जळगावच्या दिव्या भोसले यांची यिन केंद्रीय कॅबिनेट सभापती म्हणून निवड करण्यात आली.राज्यातील लाखो युवकांनी दिव्या भोसले...
error: Content is protected !!