Wednesday, August 17, 2022

पैठण येथे होणाऱ्या आठव्या राष्ट्रीय महा अधिवेशनाच्या तयारीला लागा- करण गायकर

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:छावा क्रांतिवीर सेनेच्या आगामी २० ऑगस्ट २०२२ रोजी पैठण जि. संभाजीनगर येथे होणाऱ्या ८ राष्ट्रीय महाअधिवेशना संदर्भात संगमनेर जि. अहमदनगर येथे सर्व जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्वाची नियोजन बैठक संपन्न झाली.

बैठकीच्या सुरुवातीला संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष करण भाऊ गायकर प्रदेश महासचिव शिवाजीराजे मोरे विद्यार्थी आघाडी प्रदेश अध्यक्ष प्रा उमेश शिंदे प्रदेश कार्याध्यक्ष चंद्रशेखर विशे

यांचा जिल्ह्याच्या वतीने सत्कार करण्यात आला त्यानंतर उपस्थित जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांकडून आतापर्यंत झालेल्या सर्व कामाचा आढावा घेण्यात आला संघटनेचे जिल्हाध्यक्ष आशिष कानवडे

उत्तर विभागाचे जिल्हाध्यक्ष रोहित यादव यांनी प्रास्ताविकामध्ये येणाऱ्या अधिवेशनात जास्तीत जास्त लोक या अधिवेशनात घेऊन येऊ असं शब्द दिला संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष चंद्रशेखर विशे प्रदेश महासचिव शिवाजी राजे मोरे यांनी

आपल्या भाषणांमध्ये संघटना वाढीसाठी काय काय उपाययोजना केल्या पाहिजे यासाठीचे मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांकडे प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक उमेश शिंदे यांनी सामाजिक विषयांबरोबर शेतकरी विद्यार्थी महिला याबाबत संघटनेने गाव

लेवल पर्यंत जाऊ या सर्व विषयांना आपण सर्वांनी माझ्या फोडली पाहिजे त्यावर आक्रमकपणे आंदोलने केली पाहिजे सर्वसामान्य लोकांना न्याय दिला पाहिजे हे देत असताना तुम्हाला कुठेही अडचण आले तुम्ही आमच्यापर्यंत कळवा त्यावेळी तुम्हाला

पाहिजे ती मदत संघटनेच्या वतीने आम्ही वरिष्ठ पदाधिकारी करू यावेळी अध्यक्ष भाषणामध्ये संस्थापक अध्यक्ष यांनी सांगितले की येणाऱ्या अधिवेशन हे संघटनेचे गतवैभव सिद्ध करणाऱ्या असेल सध्या महाराष्ट्रामध्ये जे राजकीय परिस्थिती निर्माण झाली

आहे तिला एक पर्याय म्हणून आगामी काळात छावा क्रांतिवीर सेना काम करेल आजच्या या बैठकीला उपस्थित असलेल्या पदाधिकाऱ्यांनी संघटनेचे काम करताना तन-मन-धन या सगळ्या गोष्टींचा विचार करून संघटने प्रति आपले निष्ठा

जपली पाहिजे काम करत असताना फक्त झेंडे घेऊन घोषणा देणारे कार्यकर्ते नको तर संघटनेवर मनापासून प्रेम करणारे कार्यकर्ते निर्माण करायला पाहिजे यासाठी आपण सर्वांनी आजपासून कामाला लागा नगर जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी अत्यंत

उत्कृष्टपणे काम करत आहेत संघटना जोमाने या जिल्ह्यात वाढत आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे परंतु हे काम करत असताना आपल्या सगळ्या तरुणांना कामधंदा उपलब्ध झाला पाहिजे संघटनेच्या माध्यमातून शासनाच्या जेवढा उपाय योजना आहे.

त्या उपायोजनांचा आपण सर्वांनी त्याचा अभ्यास करून सर्वसामान्य लोकांना मदत होईल असे प्रयत्न नगर जिल्ह्यात येणाऱ्या पुढील काळात करा अधिवेशन मोठ्या प्रमाणात होण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न

करा जास्तीत जास्त पदाधिकारी व कार्यकर्ते या अधिवेशनासाठी पैठण या ठिकाणी येथील याचे सूक्ष्म नियोजन करा कुठल्याही पदाधिकाऱ्याला काही अडचण असेल तर त्याने स्पष्टपणे ती वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना सांगितले पाहिजे

त्यावर मार्ग काढून न्याय दिला जाईल आज आपण सर्वांनी या ठिकाणी ज्या पद्धतीने बैठकीच्या आयोजन केले त्याबद्दल सर्व आयोजकांचे मनापासून धन्यवाद देतो यावेळी शेतकरी आघाडीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र दुबे यांनी आतापर्यंत संघटनेच्या माध्यमातून

शेतकऱ्यांच्या समर्थनात जे आंदोलने केली त्याला चांगले यश आले त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये संघटनेबद्दल एक आत्मीयता तयार झाली आहे हे आमच्यासाठी आनंददायी गोष्ट आहे की आम्ही सर्व या संघटनेचे घटक आहोत याचा आम्हाला अभिमान आहे .

येणाऱ्या काळात संपूर्ण जिल्हाभर शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठविला जाईल राज्यकर्त्यांना भेटीस धरून शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी छावा क्रांतिवीर सेनेचा लढा येणाऱ्या काळात असेल. यावेळी या मीटिंगसाठी आयटी सेल प्रदेश कार्याध्यक्ष वैभव दळवी भारत पिंगळे गणेश वाकचौरे

उत्तर महाराष्ट्र प्रदेश संपर्क प्रमुख संजय चौधरी,जिल्हा शेतकरी आघाडी जिल्हाध्यक्ष रवी डुबे,जिल्हा कार्याध्यक्ष विठ्ठल भुजाडे,संगमनेर तालुकाध्यक्ष गणेश थोरात, तालुका उपद्याक्ष सचिन गांजवे,आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

तर आभार कामगार आघाडी तालुकाध्यक्ष संदीप राऊत यांनी मानले

जिल्ह्यातील विविध तालुक्यातील कार्यकर्त्यांनी आज संघटनेत प्रवेश केला त्यांच्या नियुक्ती खालील प्रमाणे

सौ राजश्रीताई वाकचौरे(महिला आघाडी जिल्हाध्यक्ष उत्तर)

भागवत कानवडे(कलाकार आघाडी तालुकाध्यक्ष संगमनेर)

नवनाथ राऊत(शेतकरी आघाडी तालुकाध्यक्ष संगमनेर)

लक्ष्मण सातपुते

 (वि.आ.तालुकाध्यक्ष संगमनेर)

गणेश फरगडे(तालुका संपर्क प्रमुख संगमनेर)

किशोर पावसे(शेतकरी आघाडी तालुकाध्यक्ष कोपरगाव)

हर्षल चिकने(युवक आघाडी तालुका अध्यक्ष कोपरगाव)

सविता कनिगध्वज(तालुका अध्यक्ष आरोग्य आघाडी पारनेर)

मनोहर जाधव(संगमनेर शहर अध्यक्ष)

सचिन कानवडे(निमगाव बु संगमनेर शाखा प्रमुख) आदींसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

ताज्या बातम्या

error: Content is protected !!