नेवासा/प्रतिनिधी
जायकवाडी धरणाचे जलाशय प्रचलन आराखड्यानुसार आवश्यक असणारी पाणी पातळीचे नियमन करावयाच असल्याने अशीच आवक चालू राहिल्यास नजीकच्या काळात कधीही धरणाच्या गेटमधून- सांडव्याद्वारे गोदावरी नदीमध्ये पुरपाणी सोडावे लागणार आहे असल्याने गोदावरी नदी काठच्या दोन्ही तीरावरील लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन जायकवाडी पाटबंधारे विभागाने केले आहे.
जायकवाडी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्र.भा.जाधव यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सोमवार दि. १८/०७/२०१२ रोजी जायकवाडी प्रकलप, पैठण मध्ये ७६.९७ ४ जिवंत पाणी साठा आहे. पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस होत असून त्यामुळे पाणलोट क्षेत्रातील नदी, नाल्यांद्वारे जा धरणात पाण्याची आवक वाढत असल्याने धरणाची पाणी पातळी वाढत आहे. धरणाचे जलाशय प्रचलन आराखड्यानुसार (Reservoir Operation Schedule) आवश्यक असणारी पाणी पातळीचे नियमन करावयाची असल्याने अशीच आवक चालू राहिल्यास नजीकच्या काळात कधीही धरणाच्या गेटमधून / सांडव्याद्वारे गोदावरी नदीमध्य पुरपाणी सोडावे लागणार आहे. तरी गोदावरी नदी काठच्या दोन्ही तीरावरील लोकांना सतर्क राहणंबाबत तसंच नदापात्रात कुणाही जाऊ नये. पाळीव प्राणी, गुरेढोरे, विद्युत मोटारी तसेच इतर तस्तम साहित्य व तात्काळ काढून पण्ययावत तसंच कुठलीही जीवित वा वित्तहानी होणार नाही, या बाबद उक्त गावाना तात्काळ सावधानतेचा इशारा देणे तसेच संबंधित यंत्रणांना खबरदारी घेणे बाबत आपले स्तराहुन आदेश देण्यात यावेत अशा सूचना
अधीक्षक अभियंता व प्रशासक, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, औरंगाबाद, अधीक्षक अभियंता, नांदेड पाटबंधारे मंडळ, नांदेड,तसेच पैठण, अंबड, घनसावंगी, परतुर, गेवराई,माजलगाव चे तहसीलदार यांना देण्यात आल्या आहेत.