शेवगाव
शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ.क्षितिज घुले पाटील यांनी शेवंगावकरांसोबत केलेल्या ‘चाय पे चर्चा’ ची सध्या शोसल मीडियावर जोरदार चर्चा आहे.
शेवगाव शहरात काल लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिन कार्यक्रम पार पडला.कार्यक्रमानंतर स्थानिक व्यापारी व दुकानदारांनी चहासाठी डॉ.क्षितिज भैय्या घुले पाटील यांना आग्रह केला.रिमझिम पाऊस चालू असतांना देखील क्षितिज भैय्यांनी मोठ्या मनाने आमंत्रण स्वीकारून जवळच असलेल्या चहाच्या टपरीवर चहा पिण्यासाठी आले.सोबत अनेक व्यापारी,कार्यकर्ते असल्यामूळे अगदी साध्या व्यक्ती प्रमाणे कुठलाही मोठे पणा न दाखवता बाहेरच मांडलेल्या खुर्चीनवर बसूनच जमलेल्या लोकांशी अगदी मोकळेपणाने गप्पां मारल्या.
यावेळी राजकीय ,व्यवसायीक ,शहरातील विकास कामे अश्या अनेक विषयांवर स्थानिकांनी आपल्या भावना क्षितिज भैय्यांसमोर मंडल्या.क्षितिज भैय्यांनी देखील दिलखुलास गप्पा मारल्या.
चहा झाल्यानंतर भैय्यांनी आदराने सर्व व्यापारी,दुकानदार तसेच जमलेल्या सर्वांचे आभार मानून आपल्या पुढील दौऱ्यासाठी प्रस्थान केले.