Wednesday, August 17, 2022

या खाद्यपदार्थांवर जीएसटी नाहीच…

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: सुटे धान्य, दही, लस्सी अशा काही वस्तूंवर जीएसटी लावलेला नसून या वस्तू पॅकेजिंग करून विकल्यास किंवा त्या

स्वरूपात असल्यासच पाच टक्के कर लागणार असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ट्वीटरवरून स्पष्ट केले. सोबत कोणत्या सुट्या वस्तूंवर जीएसटी लागणार नाही, याची यादीही त्यांनी दिली.

या वस्तू पॅकेजिंग केलेल्या नसल्यास त्यांना कर लागणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. गेल्या महिन्यात झालेल्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. २५

किलो वजनाच्या प्री-पॅकेज केलेल्या आणि लेबल केलेल्या खाद्यपदार्थांवर ५ टक्के जीएसटी लावण्यात आला होता. याची अंमलबजावणी १८ जुलैपासून झाली होती. यामध्ये अनेक वस्तूंचा

जीएसटीदेखील वाढविण्यात आला. यामुळे अनेक पॅकेजबंद वस्तू, खाद्यपदार्थ महाग झाले.यावर शून्य कर: सुट्या डाळी, गहू, राई, ओट्स, मका, तांदूळ, पीठ, रवा, बेसन, मुढी, दही आणि लस्सी.

कर लावण्याची पहिली वेळ?खाद्यपदार्थांवर कर लावण्याची ही काही पहिली वेळ आहे का? यापूर्वीही अनेक राज्य यावर कर आकारत होते.

पंजाबने तर २००० कोटी रुपये खरेदी शुल्काद्वारे कमावले आहेत. उत्तर प्रदेशनेही ७०० कोटी रुपये तिजोरीत भरले आहेत. – निर्मला सीतारामन, केंद्रीय अर्थमंत्री

ताज्या बातम्या

error: Content is protected !!