माय महाराष्ट्र न्यूज:जेव्हा जोडपे नातेसंबंधात येतात तेव्हा ते एकमेकांना आपल्या मनातील गोष्टी सांगतात. मुली त्यांच्या आयुष्याशी निगडीत
प्रत्येक गोष्ट त्यांच्या प्रियकर किंवा नवऱ्याला सांगतात. त्याचप्रमाणे पुरुष देखील त्यांच्या मनापासून ते त्यांच्या पत्नी किंवा मैत्रिणीपर्यंत प्रत्येक गोष्टीबद्दल बोलतात.
मुलींना असे वाटते की त्यांचा पार्टनर त्यांच्यासोबत सर्व काही शेअर करतो. पण प्रत्येक नात्यात अनेक गुपिते असतात. पुरुष प्रत्येक गोष्ट त्यांच्या जोडीदारांसोबत शेअर करत नाहीत.
‘मर्द को कभी दर्द नहीं होता’ हा प्रसिद्ध डायलॉग तुम्ही ऐकलाच असेल. पण पुरुषही माणूसच असतो आणि त्यांनाही वेदना होतात.पण बहुतेक
पुरुष इतरांसमोर, विशेषतः त्यांच्या जोडीदारासमोर वेदना व्यक्त करत नाहीत. तो दुखावला गेला असेल तर जोडीदारासमोर त्याच्या वेदना किंवा कोणतीही दुःखद गोष्ट व्यक्त करताना तो भावूक होत नाही.
मुलं भावनिकदृष्ट्या त्यांच्या पार्टनरवर अवलंबून असतात. प्रेयसी किंवा पत्नीसोबतच्या नात्याबद्दल मुलांना अनेक अपेक्षा असतात. जे मुले सहसा कोणत्याही गोष्टीचा काळजी करत नाहीत.
त्यांच्या जोडीदाराचा भावनिक आधार हवा असतो परंतु ते हे गोष्ट कधीच स्वीकारत नाही.प्रत्येक पुरुषाला स्त्रियांनी त्याच्याकडे लक्ष द्यावे असे वाटते. पण पुरुष हे कधीच मान्य करत नाहीत.
त्याच प्रमाणे पुरुष त्यांच्या मनातील भिती कधीच व्यक्त करत नाहीत.आपला झालेला अपमान कधीच कोणी विसरत नाही. पण महिला आपल्याला
झालेल्या सर्व गोष्टी सांगतात पण पुरुष मात्र त्याचे सर्व अपमान आपल्यापर्यंतच ठेवतो.