Wednesday, August 17, 2022

पुरुषांसाठीही गर्भनिरोधक गोळ्या उपलब्ध पण 

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:गर्भनिरोधक गोळ्या आतापर्यंत केवळ महिलांसाठी उपलब्ध होत्या, पण पुरुषांसाठीदेखील अशा गोळ्या तयार करण्यात आल्या आहेत.

या गोळ्या तयार झाल्या असून लवकरच बाजारात उपलब्ध होणार आहेत. या गोळ्या पुरुषाच्या शरीरातील शुक्राणूंचं उत्पादन रोखण्याचं काम करतात, त्यामुळे जोडीदाराची प्रेग्नसी रोखणं शक्य होतं.

तसंच या गोळ्यांमुळे कोणतेही दुष्परिणाम होणार नाहीत, असं म्हटलं जातंय.संशोधकांच्या मते, या गोळ्या गर्भधारणा रोखण्यासाठी कंडोम आणि नसबंदीपेक्षा जास्त चांगला पर्याय ठरू शकतात.

संशोधक Tamar Jacobsohn यांच्या मते, पुरुष गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर हा पुरुष आणि महिलांसाठी कुटुंब नियोजनाचे पर्याय वाढवेल आणि नको असलेली गर्भधारणा

रोखण्यासाठीदेखील खूप मदत करेल. कुटुंब नियोजनात पुरुष पूर्वीपेक्षा अधिक सक्रिय भूमिका बजावू शकतील. या गोळ्यांच्या चाचणीत सहभागी झालेल्या तीन जणांनी Busenessinsider

शी बोलताना त्यांचे अनुभव सांगितले. या संदर्भात आज तकने वृत्त दिलं.युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टन सेंटर फॉर रिसर्च इन रिप्रॉडक्शन अँड कॉन्ट्रासेप्शनच्या (CRRC) संशोधकांच्या म्हणण्यानुसार,

फार्मास्युटिकल कंपन्यांकडून गुंतवणुकीचा अभाव आणि पुरुषांची आवड समजून घेण्यात उशीर झाल्यामुळे पुरुष गर्भनिरोधकांचे पर्याय शोधण्यात उशीर झाला. परंतु, नुकत्याच

प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, एका संशोधनात 100 पुरुषांनी 28 दिवसांसाठी पुरुष गर्भनिरोधक गोळ्या घेतल्या. त्या 100 लोकांपैकी 75 टक्के लोकांना पुन्हा गोळ्या घ्यायच्या आहेत.

दरम्यान सध्याच्या काळात गर्भधारणा टाळण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. या पर्यायांमध्ये नसबंदी, कंडोमचा वापर आणि गर्भनिरोधक गोळ्यांचा समावेश आहे.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!