Wednesday, August 17, 2022

नगर जिल्ह्यातील हे मोठे धरण ओव्हरफ्लो

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा पाणलोटात पाऊस सुरू असून आवक वाढत असल्याने काल मंगळवारी सकाळपासून

भंडारदरा धरणातील पाणीपातळी नियंत्रित करण्यात येत आहे. त्यामुळे 2339 क्युसेकने प्रवरा नदीत 11039 दलघफू क्षमतेच्या या धरणात काल सायंकाळी पाणीसाठा 9390 दलघफू

(85 टक्के) झाला होता. पावसाचे प्रमाण टिकून राहिल्यास तसेच वाढल्यास ओव्हरफ्लोत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.सोमवारपासून पावसाचा जोर पुन्हा वाढल्याने पाणी

नियंत्रित करण्यासाठी पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार काल मंगळवारी सकाळी आठ वाजता विद्युत गृह मधून 832, व्हॉल्वद्वारे 289 आणि सांडव्यातून 1218 असा

एकूण 2339 क्युसेकने पाणी सोडण्यात आले. दिवसभरात 90 दलघफू पाणी सोडण्यात आले. हे पाणी खाली निळवंडे धरणात जमा होत आहे. त्यामुळे निळवडे 80 टक्के भरले आहे.

हेही धरण लवकरच ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे. केवळ दोन आठवड्यात ही किमया झाली आहे. या धरणात नव्याने 7521 दलघफू पाणी दाखल झाले. गत बारा तासांत 233 दलघफू पाणी आले.

निळवंडेतून 800 क्युसेकने प्रवरा नदीत पाणी सुरू आहे.काल दिवसभरात भंडारदरा येथे 25 मिमी पावसाची नोंद झाली. भंडारदरा पाणलोटात काल सकाळपर्यंत नोंदवला गेलेला

पाऊस असा (मिमी)-भंडारदरा 127, घाटघर 165, रतनवाडी 172, वाकी 103.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!