Thursday, August 11, 2022

आ.शंकरराव गडाख यांच्या विशेष पाठपुराव्याने नेवासा तालुक्यातील 25 गावांना 1कोटी 25 लक्ष रुपयांचे व्यायाम शाळा साहित्य मंजूर

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

नेवासा तालुक्यातील 25 गावांना महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा क्रीडांगण योजनेअंतर्गत 1 कोटी 25 लक्ष रुपयाचा निधी मंजूर झाला असून संबंधित गावामध्ये या विभागामार्फत साहित्य पोहोच करण्याचे काम सुरू झाले आहे अशी माहिती आ शंकरराव गडाख यांच्या जनसंपर्क कार्यालयातून देण्यात आली.

तालुक्यातील विविध गावांमधील तरुणांना व्यायामाची आवड निर्माण होऊन तरुण सुदृढ व्हावेत यासाठी माजी मंत्री आ.शंकरराव गडाख यांच्या मार्फत जिल्हा क्रीडांगण योजने अंतर्गत बंदिस्त व खुले या दोन्ही प्रकारचे नेवासा तालुक्यातील विविध गावांमधील प्रस्ताव क्रीडा विभागाकडे पाठवून त्यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा करण्यात आला त्यास नुकतीच मंजुरी देण्यात आली. त्यानुसार निंभारी, वडाळा बहिरोबा,उस्थळ दुमला, बहिरवाडी ,खडका, माका, वरखेड ,राजेगाव, लोहारवाडी , खुपटी, सोनई ,शिंगवेतुकाई ,जेऊर हैबती, पिंप्री शहाली, जळके खुर्द, दिघी, मुकिंदपुर,भेंडा बुद्रुक, गेवराई, भालगाव,बाभुळखेडे, गोंडेगाव, अंतरवली, तरवडी, देडगाव या नेवासा तालुक्यातील गावांना व्यायाम शाळा साहित्याचा लाभ मिळणार आहे.विविध गावांमधील तरुण,मित्रमंडळ यांनी वेळोवेळी व्यायाम शाळा साहित्याची मागणी आ. शंकरराव गडाख यांच्याकडे केली होती. या मागणीची योग्य ती दखल घेऊन आ.गडाख यांनी महाराष्ट्र शासनाच्या व जिल्हा क्रीडा योजनेअंतर्गत 1 कोटी 25 लक्ष रुपयांचे व्यायाम शाळा साहित्य मंजूर केले आहे प्रत्येक गावामध्ये प्रत्येकी 5 लक्ष प्रमाणे व्यायाम शाळा साहित्य देण्यात येणार असल्याने गावांमधील तरुण ,ग्रामस्थ आदींनी माजी मंत्री आ.शंकरराव गडाख यांचे आभार मानले आहे.

———–चौकट——–
माजी मंत्री आ.शंकरराव गडाख यांनी विशेष प्रयत्नपूर्वक व्यायाम साहित्य मंजूर केल्यामुळे तरुणांना गावांतच व्यायाम करणे शक्य होणार आहे.व्यायाम साहित्य विशेष प्रयत्नपूर्वक मंजूर केल्याबद्दल आ. गडाख यांचे ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन.
-गणेश भोरे
खडका,ता नेवासा.

 

ताज्या बातम्या

भेंडा बुद्रुक ग्रामपंचायत हर घर तिरंगा अभियान राबविणार-सरपंच प्रा.उषा मिसाळ

नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक ग्रामपंचायत हद्दी मध्ये दि.१३ ऑगष्ट ते १५ ऑगष्ट दरम्यान भारत देश स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हर घर तिरंगा अभियान राबवणार आहे...

जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या नेवासा ते औरंगाबाद मोफत रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ

नेवासा/प्रतिनिधी श्री क्षेत्र नाणीज येथील जगदगुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या वतीने नेवासा फाटा येथे मोफत रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ मंगळवार दि.९ ऑगस्ट रोजी विधिवत...

पत्रकारिता अभ्यासक्रमात भाऊसाहेब कासार प्रथम तर रमेश खरबस द्वितीय

  माय महाराष्ट्र न्यूज:यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापिठाच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षेत शिक्षक भाऊसाहेब कासार हे प्रथम तर रमेश खरबस यांनी द्वितीय...

नागेबाबा मल्टीस्टेटच्या मयत सभासदाच्या वारसाला १० लाखाचा धनादेश प्रदान

राहुरी/प्रतिनिधी श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट सोसायटीच्या मयत सभासदाच्या वारसांना नागेबाबा सुरक्षा कवच योजनेअंतर्गत आज राहुरी येथे माजी मंत्री आ.प्राजक्त तनपुरे व शिवशाहीर विजय तनपुरे यांचे...

हनुमंतराय ही बुद्धी आणि शक्तीची देवता- स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज

माय महाराष्ट्र न्यूज: राहुल कोळसे:--  हनुमंतराय ही बुद्धी आणि शक्तीची देवता असल्याने प्रत्येकाने आपल्या जीवनात  हनुमंतरायांची मनोभावे सेवा केली पाहिजे असे प्रतिपादन श्री क्षेत्र...

यिन केंद्रीय कॅबिनेट सभापतीपदी दिव्या भोसले यांची वर्णी संपूर्ण राज्यातील युवकांमधून झाली निवड

मुंबई/प्रतिनिधी नुकत्याच झालेल्या यिन 'कॉनक्लेव २०२२' कार्यक्रमात भरघोस मताधिक्क्याने जळगावच्या दिव्या भोसले यांची यिन केंद्रीय कॅबिनेट सभापती म्हणून निवड करण्यात आली.राज्यातील लाखो युवकांनी दिव्या भोसले...
error: Content is protected !!