माय महाराष्ट्र न्यूज:बँक ऑफ बडोदा ही भारतीय राष्ट्रीयीकृत बँक आहे. या बँकेची स्थापना तिसरे सयाजीराव गायकवाड यांनी इ.स. १९०८ मध्ये केली.
आज बँकेचा 115 वा स्थापना दिवस संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला तसेच अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील वडाळा येथील शाखेतही स्थापना दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला गेला.
याप्रसंगी वडाळा येथील ग्रामपंचायत सरपंच सौ मिनलताई मोटे,श्री राहुल मोटे, श्री ॲड चांगदेव मोटे ,श्री बाबासाहेब मोटे व वडाळा येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रम प्रसंगी बँकेचे शाखाधिकारी कैलास गांगुर्डे यांचे मोलाचे सहकार्य लाभले तसेच यामध्ये बँकेच्या विविध योजनांचे वितरण करण्यात आले .
यामध्ये सोने तारण, पीक कर्ज ,कार लोन, महिला बचत गट, प्रधानमंत्री विमा योजना तसेच खरवंडी येथील उज्वला संजय पंडित व रूपचंद रेळेकर यांना प्रत्येकी दोन लाखांचा विमा प्रदान करण्यात आला.
तसेच बँकेने नेमणूक केलेली सर्व बँक मित्र व सोने चिकित्सक श्री दिलीप जगदाळे यांचे ही उपस्थिती होती.