Thursday, August 11, 2022

पवार यांच्या संमतीने राष्ट्रवादीचे सगळे विभाग व सेल बरखास्त पण महाराष्ट्रात

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:शिवसेनेमध्ये भूकंप सत्र सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना

चांगलाच धक्का दिला. राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे विभाग आणि सेल तडकाफडकी बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचा निर्णय घेतला. मात्र, हा निर्णय

महाराष्ट्राला लागू नसणार आहे, अशी माहिती प्रफुल्ल पटेल यांनी दिली.राष्ट्रवादी काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी प्रफुल्ल पटेल यांचं पत्र समोर आलं आहे. या पत्रामध्ये त्यांनी एनसीपीचे अध्यक्ष

शरद पवार यांच्या संमतीने राष्ट्रवादीचे सगळे विभाग आणि सेल बरखास्त केल्याची माहिती दिली आहे. मात्र, पटेल यांनी ट्वीट करून स्पष्ट केलं आहे, महाराष्ट्र वगळून संपूर्ण देशासाठी हा निर्णय घेतला आहे.

आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेब यांच्या मान्यतेने, सर्व राष्ट्रीय स्तरावरील विभाग आणि सेल, राष्ट्रवादी महिला काँग्रेस वगळून राष्ट्रवादी युवक काँग्रेस आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची

भूमिका तात्काळ प्रभावाने विसर्जित करण्यात आली आहे. मात्र हा निर्णय महाराष्ट्रासाठी लागू नसणार आहे, असा खुलासा पटेल यांनी केला.विशेष म्हणजे, एकीकडे शिवसेनेत एकनाथ

शिंदे यांनी शिवसेनेच्या 40 आमदारांसोबत केलेल्या बंडामुळे महाविकासआघाडी सरकार कोसळलं आणि उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. आमदारांनंतर शिवसेनेच्या

खासदारांनीही एकनाथ शिंदेंना पाठिंबा दिला. शिवसेनेच्या 19 पैकी 12 खासदारांनी आम्ही एकनाथ शिंदेंसोबत असल्याचं स्पष्ट केलं. शिवसेनेच्या आमदारांसोबतच खासदारांनीही या बंडाला

राष्ट्रवादी काँग्रेसला जबाबदार धरलं. एकनाथ शिंदे यांच्यासोबत फक्त आमदार आणि खासदारच नाही तर शिवसेनेचे पदाधिकारीही जात आहेत. अशातच सर्व विभाग बंद

करण्याचा आदेश आल्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात खळबळ उडाली होती. पण आता त्यावर पटेल यांनी खुलासा केला आहे.

ताज्या बातम्या

भेंडा बुद्रुक ग्रामपंचायत हर घर तिरंगा अभियान राबविणार-सरपंच प्रा.उषा मिसाळ

नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक ग्रामपंचायत हद्दी मध्ये दि.१३ ऑगष्ट ते १५ ऑगष्ट दरम्यान भारत देश स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हर घर तिरंगा अभियान राबवणार आहे...

जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या नेवासा ते औरंगाबाद मोफत रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ

नेवासा/प्रतिनिधी श्री क्षेत्र नाणीज येथील जगदगुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या वतीने नेवासा फाटा येथे मोफत रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ मंगळवार दि.९ ऑगस्ट रोजी विधिवत...

पत्रकारिता अभ्यासक्रमात भाऊसाहेब कासार प्रथम तर रमेश खरबस द्वितीय

  माय महाराष्ट्र न्यूज:यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापिठाच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षेत शिक्षक भाऊसाहेब कासार हे प्रथम तर रमेश खरबस यांनी द्वितीय...

नागेबाबा मल्टीस्टेटच्या मयत सभासदाच्या वारसाला १० लाखाचा धनादेश प्रदान

राहुरी/प्रतिनिधी श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट सोसायटीच्या मयत सभासदाच्या वारसांना नागेबाबा सुरक्षा कवच योजनेअंतर्गत आज राहुरी येथे माजी मंत्री आ.प्राजक्त तनपुरे व शिवशाहीर विजय तनपुरे यांचे...

हनुमंतराय ही बुद्धी आणि शक्तीची देवता- स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज

माय महाराष्ट्र न्यूज: राहुल कोळसे:--  हनुमंतराय ही बुद्धी आणि शक्तीची देवता असल्याने प्रत्येकाने आपल्या जीवनात  हनुमंतरायांची मनोभावे सेवा केली पाहिजे असे प्रतिपादन श्री क्षेत्र...

यिन केंद्रीय कॅबिनेट सभापतीपदी दिव्या भोसले यांची वर्णी संपूर्ण राज्यातील युवकांमधून झाली निवड

मुंबई/प्रतिनिधी नुकत्याच झालेल्या यिन 'कॉनक्लेव २०२२' कार्यक्रमात भरघोस मताधिक्क्याने जळगावच्या दिव्या भोसले यांची यिन केंद्रीय कॅबिनेट सभापती म्हणून निवड करण्यात आली.राज्यातील लाखो युवकांनी दिव्या भोसले...
error: Content is protected !!