Wednesday, August 17, 2022

नगरच्या शिवसेनेत अखेर फूट ? आजी-माजी नगरसेवक व कार्यकत्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या गटात

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी होणाऱ्या शिवसेना पदाधिकारी व नेत्यांची संख्या वाढत आहे.

अशातच अहमदनगर शहरातील काही आजी, माजी नगरसेवक आज पुन्हा एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेले. या मध्ये शिवसेनेचे अहमदनगर दक्षिण जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे यांचे

चिरंजिव नगरसेवक योगीराज गाडे, बंधू रमाकांत गाडे यांचाही समावेश आहे.अहमदनगर शहरातील शिवसेनेत मागील दीड वर्षांपासून दोन गट स्पष्ट दिसत आहेत. यातच नगरसेवक अनिल शिंदे

हे एकनाथ शिंदे यांचे समर्थक मानले जातात. अनिल शिंदे यांच्या पत्नी शीला शिंदे या अहमदनगरच्या माजी महापौर राहिल्या आहेत. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर अनिल शिंदे यांनी पेढे वाटत आनंद व्यक्त केला होता.

गुरूपौर्णिमेच्या दिवसी अनिल शिंदे हे नगरसेवक सचिन जाधव व अनिल लोखंडे यांच्यासह एकनाथ शिंदे यांना भेटून आले होते. मागील महिन्यात शशिकांत गाडे यांनी शिवसेनेचा मेळावा घेतला.

या मेळाव्याला अनिल शिंदे व काही नगरसेवक अनुपस्थित होते. काल (मंगळवारी) शिवसेना संपर्क प्रमुख भाऊ कोरगावकर यांनी घेतलेल्या मेळाव्यातही काही नगरसेवक अनुपस्थित होते.

काल सायंकाळी शिवसेनेचे सहा नगरसेवक, काही माजी नगरसेवक व शिवसैनिक एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी मुंबईला गेले.एकनाथ शिंदे यांनी भेट घेण्यासाठी गेलेल्यांत नगरसेवकांत

शिवसेनेचे जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे यांचे यांचे बंधू रमाकांत गाडे, नगरसेवक अनिल शिंदे, योगीराज गाडे, सचिन जाधव, मदन आढाव, सुभाष लोंढे, सुभाष लोंढे, माजी शहर प्रमुख

दिलीप सातपुते, माजी नगरसेवक अनिल लोखंडे, चंद्रकांत (काका) शेळके, अक्षय कानवणे, प्रकाश फुलारी,संग्राम शेळके, अभिषेक भोसले आदींचा यात समावेश आहे. भेटीसाठी

गेलेल्या शिवसैनिकांनी छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतीबा फुले यांच्या पुतळ्यांसाठी निधीच्या मागणीचे निवेदन एकनाथ शिंदे यांना दिले. तसेच चर्चा ही केली.

अहमदनगर महापालिकेत शिवसेनेच्या रोहिणी शेंडगे या महापौर आहेत. त्याच शिवसेनेच्या गटनेत्याही आहेत. शिवसेनेचा स्वतंत्र गट तयार करण्यासाठी आणखीही काही नगरसेवक

या गटाला आवश्यक ठरणार आहेत. त्यामुळे शिंदे गटात आणखी किती नगरसेवक येतात यावर या गटाचे भवितव्य ठरणार आहे. मात्र नगरमधील शिवसेनेला खिंडार पडले हे मात्र आता स्पष्ट झाले आहे.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!