Wednesday, August 17, 2022

नेवासाचा आठवडे बाजार बंद ठेवण्याचा आदेश

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

कामीका एकादशीनिमित्त भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता दि.२४ जूलै रोजीचा नेवासा आठवडे बाजार बंद ठेवण्याचे आदेश उपविभागीय दंडाधिकारी श्रीनिवास अर्जुन यांनी दिलेत.

आषाढी वदय कामिका एकादशी व नेवासा आठवडे बाजार‌ रविवार दि.२४ जूलै २०२२ रोजी आहे. आषाढी एकादशीला श्री क्षेत्र पंढरपूर येथे गेलेले वारकरी परतीच्या मार्गावर नेवासा येथे श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी येतात. यामुळे अंदाजे ७ लाख भाविकांची गर्दी शहरात होत असते.  म्हणून मोठया प्रमाणावर होणारी अनावश्यक गर्दी टाळणेकामी नेवासा खुर्द येथील आठवडे बाजार रविवार दि.२४ जूलै २०२२ रोजी बंद ठेवण्यात येत आहेत. असे आदेश अहमदनगर उपविभागीय दंडाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जून यांनी जारी केले आहेत.
आषाढी वदय कामिका एकादशी व आठवडे बाजार दि. २४ जूलै‌ २०२२  एकाच दिवशी असल्यामुळे शहरात मोठया प्रमाणावर अनावश्यक गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून मोठया प्रमाणावर होणारी अनावश्यक गर्दी टाळणेकामी मार्केट अँड फेअर अॅक्ट 1862 चे कलम 3, 4 व 5 मधील तरतुदी अन्वये  नेवासा तालुक्यातील नेवासा खुर्द, ता. नेवासा येथील दि. २४ जूलै २०२२ रोजीचा आठवडे बाजार बंद ठेवणेबाबत आदेश उपविभागीय दंडाधिकारी श्रीनिवास अर्जून यांनी आज रोजी पारित केले आहेत.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!