माय महाराष्ट्र न्यूज:जून महिना शेवटाकडे आला असला तरी अद्यापही राज्याच्या अनेक भागांमध्ये पावसाने हजेरी लावलेली नाही.
अशात आता शुक्रवारपासून काही भाागांमध्ये पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहेराज्यात पुढच्या 3 दिवसांमध्ये मान्सून दाखल होईल असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.23 जूनपासून कोकणातील
काही भागात, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाची अंदाज आहेतर 24-25 जूनपासून पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज वर्तवला आहे.दरम्यान, मराठवाडामधील काही भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.
अंदाजानुसार, मराठवाडा आणि विदर्भात 23 जूननंतर पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. तर 25 जूननंतर सर्वत्र चांगल्या पावसाची शक्यता आहे.आता जूनच्या शेवटच्या
आठवड्यापर्यंत मान्सून सर्वत्र दाखल होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.