Thursday, August 11, 2022

कामीका एकादशी निमित्त  नेवासाकडे येणाऱ्या वाहतूक मार्गात बदल

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

उद्या रविवार दि.२४ रोजी नेवासा येथे  कामीका एकादशीनिमीत्त पैसे खांब- ज्ञानेश्वर मंदीर येथे अंदाजे ६ ते ७ लाख भाविक दर्शनाकरीता येणयाची शक्यता असल्याने नेवासाकडे येणाऱ्या वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत.

या बाबद जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी आदेश जारी केले आहेत. दि. २४/०७/२०२२ रोजी कामिका-हृदय एकादशी असुन सदर एकादशीनिमीत्त पैसे खांब- ज्ञानेश्वर मंदीर येथे अंदाजे ६ ते ७ लाख भाविक दर्शनाकरीता येणयाची शक्यता आहे. सदर दिवशी नेवासा फाटा ते नेवासा बुद्रुक या रोडवर पायी चालणारे भाविकांची गर्दी जास्त प्रमाणात राहील. शेवगाव ते श्रीरामपुर मार्गावरील वाहतुकीमुळे पायी चालणारे भाविकांना वाहनांचा धक्का लागुन कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरीता वाहतुकीचे नियमन करणे आवश्यक आहे अशी प्रशासनाची खात्री झाल्याने मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३३ (१)(ब) नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करुन श्रीरामपुर- शेवगाव रोडवरील सर्व प्रकारची वाहतुक दि. २४/०७/२०२२ रोजीचे ००.०० वाजे (मध्यरात्री) पासून ते दि. २५/०७/२०२२ रोजीचे ००.०० वाजे (मध्यरात्री) पर्यंत खालील पर्यायी मार्गाने वळविणेबाबत आदेश जारी करीत आहे असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
*वळविण्यात आलेले मार्ग असे…*
१) औरंगाबाद कडे जाणारे वाहनांकरीता मार्ग:– i) श्रीरामपुर वैजापुर मार्गे औरंगाबाद ii) श्रीरामपुर – टाकळीभान- नेवासा बुद्रुक – भालगाव-गोधेगाव- वाशिम टोका- सिध्देश्वर मंदिर-प्रवरासंगम
 २) शेवगाव कडे जाणारे वाहनांकरीता मार्ग:– श्रीरामपुर- टाकळीभान -नेवासा बुद्रुक -भालगाव गोधेगाव- वाशिम टोका – सिध्देश्वर मंदिर- प्रवरासंगम- नेवासाफाटा- कुकाणा- शेवगाव

ताज्या बातम्या

भेंडा बुद्रुक ग्रामपंचायत हर घर तिरंगा अभियान राबविणार-सरपंच प्रा.उषा मिसाळ

नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक ग्रामपंचायत हद्दी मध्ये दि.१३ ऑगष्ट ते १५ ऑगष्ट दरम्यान भारत देश स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हर घर तिरंगा अभियान राबवणार आहे...

जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या नेवासा ते औरंगाबाद मोफत रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ

नेवासा/प्रतिनिधी श्री क्षेत्र नाणीज येथील जगदगुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या वतीने नेवासा फाटा येथे मोफत रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ मंगळवार दि.९ ऑगस्ट रोजी विधिवत...

पत्रकारिता अभ्यासक्रमात भाऊसाहेब कासार प्रथम तर रमेश खरबस द्वितीय

  माय महाराष्ट्र न्यूज:यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापिठाच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षेत शिक्षक भाऊसाहेब कासार हे प्रथम तर रमेश खरबस यांनी द्वितीय...

नागेबाबा मल्टीस्टेटच्या मयत सभासदाच्या वारसाला १० लाखाचा धनादेश प्रदान

राहुरी/प्रतिनिधी श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट सोसायटीच्या मयत सभासदाच्या वारसांना नागेबाबा सुरक्षा कवच योजनेअंतर्गत आज राहुरी येथे माजी मंत्री आ.प्राजक्त तनपुरे व शिवशाहीर विजय तनपुरे यांचे...

हनुमंतराय ही बुद्धी आणि शक्तीची देवता- स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज

माय महाराष्ट्र न्यूज: राहुल कोळसे:--  हनुमंतराय ही बुद्धी आणि शक्तीची देवता असल्याने प्रत्येकाने आपल्या जीवनात  हनुमंतरायांची मनोभावे सेवा केली पाहिजे असे प्रतिपादन श्री क्षेत्र...

यिन केंद्रीय कॅबिनेट सभापतीपदी दिव्या भोसले यांची वर्णी संपूर्ण राज्यातील युवकांमधून झाली निवड

मुंबई/प्रतिनिधी नुकत्याच झालेल्या यिन 'कॉनक्लेव २०२२' कार्यक्रमात भरघोस मताधिक्क्याने जळगावच्या दिव्या भोसले यांची यिन केंद्रीय कॅबिनेट सभापती म्हणून निवड करण्यात आली.राज्यातील लाखो युवकांनी दिव्या भोसले...
error: Content is protected !!