Thursday, August 11, 2022

आध्यात्मिक व वैज्ञानिक दृष्टया तुळशीला अनन्यसाधारण महत्व-शिवाजी महाराज देशमुख

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/प्रतिनिधी

आध्यात्मिक व वैज्ञानिक दृष्टया तुळशीला अनन्यसाधारण महत्वअसल्याचे प्रतिपादन श्री संत ज्ञानेश्वर मंदिराचे विश्वस्त शिवाजी महाराज देशमुख यांनी केले.

कामिका एकादशीच्या निमित्ताने मुळा एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष उदयन गडाख यांच्या संकल्पनेतून व विद्यार्थ्यांच्या योगदानातून श्री ज्ञानेश्वर महाविद्यालयात 100 तुळशींच्या तुलसीऑक्सी पार्क (TulsiOxy Park) ची निर्मिती केली आहे.
संत श्री ज्ञानेश्वर देवस्थानचे विश्वस्त ह.भ.प.शिवाजी महाराज देशमुख, मुळा एज्युकेशन सोसायटी कार्यकारिणी सदस्य डॉ.शिवाजी शिंदे, वृक्षमित्र महेश मापारी, जलमित्र सुखदेव फुलारी यांच्या शुभहस्ते तुळस लावून या पार्कचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी बोलताना देशमुख महाराज पुढे म्हणाले, “खडकावर असूनही श्री ज्ञानेश्वर महाविद्यालयात वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन करण्याचे खूप मोठे काम विद्यार्थी व शिक्षक करत आहेत. अशी अनेक अशक्य वाटणारी कामे महाविद्यालय गडाख कुटुंबाच्या मार्गदर्शनाने करत आहे. तुळशीला अध्यात्मिक व वैज्ञानिकदृष्टया अनन्यसाधारण महत्त्व आहे. ज्या भूमीमध्ये माऊलींनी झाडे लावण्याचा संदेश दिला, त्याच भूमीमध्ये तुळशी पार्कचा उपक्रम राबविला जात आहे. हे नक्कीच कौतुकास्पद आहे. महाविद्यालयाच्या माध्यमातून समाजात निश्चितच एक चांगल्या प्रकारचा संदेश जात आहे. पर्यावरण संवर्धनासाठी श्री ज्ञानेश्वर महाविद्यालय असे विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या पर्यावरणाप्रती जाणीवा समृध्द करण्याचे काम करत आहे.”

यावेळी मुळा एज्युकेशन सोसायटी कार्यकारिणी सदस्य डॉ.शिवाजी शिंदे, जलमित्र सुखदेव फुलारी, वृक्षमित्र महेश मापारी, प्राचार्य डॉ.गोरक्षनाथ कल्हापुरे, उपप्राचार्य प्रा.दशरथ आयनर, डॉ.किशोर धनवटे, डॉ.चांगदेव कदम, पिराजी तागड सह प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.

प्राचार्य डॉ.गोरक्षनाथ कल्हापुरे यांनी पाहुण्यांचे स्वागत व कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यश संवाद विभाग प्रमुख प्रा.देविदास साळुंके यांनी निवेदन केले. वृक्षमित्र महेश मापारी यांनी आभार मानले.

ताज्या बातम्या

भेंडा बुद्रुक ग्रामपंचायत हर घर तिरंगा अभियान राबविणार-सरपंच प्रा.उषा मिसाळ

नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक ग्रामपंचायत हद्दी मध्ये दि.१३ ऑगष्ट ते १५ ऑगष्ट दरम्यान भारत देश स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हर घर तिरंगा अभियान राबवणार आहे...

जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या नेवासा ते औरंगाबाद मोफत रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ

नेवासा/प्रतिनिधी श्री क्षेत्र नाणीज येथील जगदगुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या वतीने नेवासा फाटा येथे मोफत रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ मंगळवार दि.९ ऑगस्ट रोजी विधिवत...

पत्रकारिता अभ्यासक्रमात भाऊसाहेब कासार प्रथम तर रमेश खरबस द्वितीय

  माय महाराष्ट्र न्यूज:यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापिठाच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षेत शिक्षक भाऊसाहेब कासार हे प्रथम तर रमेश खरबस यांनी द्वितीय...

नागेबाबा मल्टीस्टेटच्या मयत सभासदाच्या वारसाला १० लाखाचा धनादेश प्रदान

राहुरी/प्रतिनिधी श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट सोसायटीच्या मयत सभासदाच्या वारसांना नागेबाबा सुरक्षा कवच योजनेअंतर्गत आज राहुरी येथे माजी मंत्री आ.प्राजक्त तनपुरे व शिवशाहीर विजय तनपुरे यांचे...

हनुमंतराय ही बुद्धी आणि शक्तीची देवता- स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज

माय महाराष्ट्र न्यूज: राहुल कोळसे:--  हनुमंतराय ही बुद्धी आणि शक्तीची देवता असल्याने प्रत्येकाने आपल्या जीवनात  हनुमंतरायांची मनोभावे सेवा केली पाहिजे असे प्रतिपादन श्री क्षेत्र...

यिन केंद्रीय कॅबिनेट सभापतीपदी दिव्या भोसले यांची वर्णी संपूर्ण राज्यातील युवकांमधून झाली निवड

मुंबई/प्रतिनिधी नुकत्याच झालेल्या यिन 'कॉनक्लेव २०२२' कार्यक्रमात भरघोस मताधिक्क्याने जळगावच्या दिव्या भोसले यांची यिन केंद्रीय कॅबिनेट सभापती म्हणून निवड करण्यात आली.राज्यातील लाखो युवकांनी दिव्या भोसले...
error: Content is protected !!