माय महाराष्ट्र न्यूज:महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर ठाकरे गटाच्या नेत्याने गंभीर आरोप केले आहेत. राष्ट्रद्रोहाचा आरोप असणाऱ्या झाकीर नाईककडून विखे-पाटील
यांच्या संस्थेला साडेचार ते पाच कोटी रुपयांची मदत देण्यात आली. या प्रकरणी एनआयएने गुन्हा दाखल करून कारवाई केली पाहीजे, अशी मागणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली. याप्रकरणी
त्यांनी पुरावेदेखील माध्यमांसमोर सादर केलीत. माध्यमांशी बोलताना राऊत यांनी विखे-पाटील यांच्या संस्थेला झाकीर नाईकडून कोटय़वधी रुपयांची मदत मिळाल्याकडे लक्ष वेधले. विखे-पाटील यांच्या संस्थेला झाकीर
नाईकडून कोटय़वधी रुपयांची मदत मिळाल्याकडे लक्ष वेधले. याप्रकरणी त्यांनी पुरावेदेखील सादर केले.
टेरेरिंग फंडिंगचा आरोप असणारे झाकीर नाईक यांच्याकडे साडेचार कोटी रुपये कसे आले? असा सवाल उपस्थित करत फडणवीस यांच्याकडे गृहमंत्री म्हणून माहिती नसेल तर आम्ही द्यायला तयार आहोत.
असही संजय राऊत यावेळी म्हणाले.काल आणि परवा सगळी कागदपत्र ईडीकडे पोहोचली आहेत त्याची पोचपावती माझ्याकडे आहे.