Thursday, August 11, 2022

संत गोदड महाराजांचा रथोत्सव उत्साहात

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:संत श्री सद्गुरु गोदड महाराज यांचा रथोत्सव मोठ्या भक्तीभावाने साजरा झाला.मध्यरात्रीपासून संत शिरोमणी सद्गुरु गोदड महाराजांच्या मंदिरात अभिषेक सुरू होता.

पहाटेपासून दर्शनासाठी मोठी गर्दी होती. दुपारी एकच्या सुमारास महाराजांचा रथ ग्रामप्रदक्षिणेस निघाला असता रथ ओढण्यासाठी भाविकांनी रांगा लावल्या होत्या. यावेळी आमदार रोहित पवार आणि खासदार

सुजय विखे यांनी गोदड महाराजांना अभिषेक घालत दर्शन घेतले. सकाळी १० वाजता मानाचा भगवा ध्वज पोलिस प्रशासनाने सवाद्य मंदिरावर चढविला. तर दुपारी शासकीय पूजा तहसीलदार यांच्या हस्ते

यात्रा कमिटी, मानकरी, सेवेकरी आणि पुजेकरी यांच्या उपस्थितीत पार पडली.पूजा संपन्न होताच रथामध्ये मूर्ती स्थापन करत संत सद्गुरु महाराजांचा रथ ग्रामप्रदक्षिणेसाठी रवाना झाला.

दोरीच्या साह्याने रथ ओढण्यासाठी ठिकठिकाणी भाविकांनी गर्दी केली होती. रथाच्या पुढे मानाच्या दिंड्या आपल्या भक्तिमय रंगात न्हावून गेल्या होत्या. शहरातील ठिकठिकाणी रथास पुष्पहार आणि नारळाचे

तोरण अर्पण केले जात होते. यावेळी पोलिस प्रशासनाने मोठा बंदोबस्त तैनात केला होता.आज शहरात कुस्त्याचा हगामा भरला जाणार असून या हगाम्यासाठी महाराष्ट्रातील नामवंत मल्ल हजेरी

लावणार असल्याची माहिती संत श्री गोदड महाराज यात्रा कमिटीकडून देण्यात आली.

ताज्या बातम्या

भेंडा बुद्रुक ग्रामपंचायत हर घर तिरंगा अभियान राबविणार-सरपंच प्रा.उषा मिसाळ

नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक ग्रामपंचायत हद्दी मध्ये दि.१३ ऑगष्ट ते १५ ऑगष्ट दरम्यान भारत देश स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हर घर तिरंगा अभियान राबवणार आहे...

जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या नेवासा ते औरंगाबाद मोफत रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ

नेवासा/प्रतिनिधी श्री क्षेत्र नाणीज येथील जगदगुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या वतीने नेवासा फाटा येथे मोफत रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ मंगळवार दि.९ ऑगस्ट रोजी विधिवत...

पत्रकारिता अभ्यासक्रमात भाऊसाहेब कासार प्रथम तर रमेश खरबस द्वितीय

  माय महाराष्ट्र न्यूज:यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापिठाच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षेत शिक्षक भाऊसाहेब कासार हे प्रथम तर रमेश खरबस यांनी द्वितीय...

नागेबाबा मल्टीस्टेटच्या मयत सभासदाच्या वारसाला १० लाखाचा धनादेश प्रदान

राहुरी/प्रतिनिधी श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट सोसायटीच्या मयत सभासदाच्या वारसांना नागेबाबा सुरक्षा कवच योजनेअंतर्गत आज राहुरी येथे माजी मंत्री आ.प्राजक्त तनपुरे व शिवशाहीर विजय तनपुरे यांचे...

हनुमंतराय ही बुद्धी आणि शक्तीची देवता- स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज

माय महाराष्ट्र न्यूज: राहुल कोळसे:--  हनुमंतराय ही बुद्धी आणि शक्तीची देवता असल्याने प्रत्येकाने आपल्या जीवनात  हनुमंतरायांची मनोभावे सेवा केली पाहिजे असे प्रतिपादन श्री क्षेत्र...

यिन केंद्रीय कॅबिनेट सभापतीपदी दिव्या भोसले यांची वर्णी संपूर्ण राज्यातील युवकांमधून झाली निवड

मुंबई/प्रतिनिधी नुकत्याच झालेल्या यिन 'कॉनक्लेव २०२२' कार्यक्रमात भरघोस मताधिक्क्याने जळगावच्या दिव्या भोसले यांची यिन केंद्रीय कॅबिनेट सभापती म्हणून निवड करण्यात आली.राज्यातील लाखो युवकांनी दिव्या भोसले...
error: Content is protected !!