राज्य ऊर्जा विभागातर्फे आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत “उज्ज्वल भारत उज्ज्वल भविष्य” पॉवर २०४७ या ऊर्जा महोत्सवाचे राज्यभर आयोजन करण्यात येणार आहे.
त्यानिमित्त जिल्हा प्रशासन व महावितरणतर्फे दि. २५ ते ३० जुलै दरम्यान अहमदनगर जिल्ह्यात महावितरणतर्फे विद्युतीकरणाच्या विविध योजनांचा जागर महोत्सवात करण्यात येणार आहे.
या महोत्सवानिमित्त मंगळवार दि. २६ जुलै रोजी सकाळी ११ वाजता पंडित जवाहरलाल नेहरू सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर तसेच गुरुवार दि. २८ जुलै रोजी सकाळी ११ वाजता राहाता
तालुक्यातील कृषी विज्ञान केंद्र, बाभळेश्वर या दोन्ही ठिकाणी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमात पथनाट्य, सांस्कृतिक कार्यक्रम, प्रदर्शने व पोस्टर्सद्वारे
वीजक्षेत्रातील प्रगती व माहितीचा जागर या कार्यक्रमादरम्यान करण्यात येणार आहे.साईबाबा संस्थान अध्यक्ष आशुतोष काळे, महापौर रोहिणी शेंडगे, खासदार डॉ. सुजय विखे पाटील
आमदार डॉ. सुधीर तांबे, बाळासाहेब थोरात, बबनराव पाचपुते, राधाकृष्ण विखे पाटील, शंकरराव गडाख, संग्राम जगताप, किरण लहामटे, नीलेश लंके, रोहित पवार, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले उपस्थित राहणार आहे.