नेवासा
हरियाणा येथे झालेल्या 69 व्या राष्ट्रीय कबड्डी चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय रेल्वे संघ संघ विजेता तर महाराष्ट्राचा कबड्डी संघ उपविजेता ठरला आहे.
हरियाणा येथे दि.24 रोजी महाराष्ट्र व हरियाणा संघात उपांत्य फेरीचा अटीतटीचा सामना झाला.त्यात महाराष्ट्र संघाने 33/27 असा 6 गुणांच्या फरकाने हरियाणावर मात करून अंतिम फेरीत प्रवेश केला होता.
दि.24 रोजी रात्री 9 वाजता भारतीय रेल्वे व महाराष्ट्र संघात अटीतटीचा अंतिम सामना झाला.या सामन्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून होते.भारतीय रेल्वे संघाने सुरुवाती पासूनच चढाई करत गुणांची संख्या वाढवत नेऊन यशाकडे वाटचाल केली होती.महाराष्ट्र संघाने शर्थीचे प्रयत्न करून रेल्वे संघाची गुण संख्या कमी करण्याचा आटोकाठ प्रयत्न केला.मात्र रेल्वे संघाने 38/21 अशा 16 गुणांच्या फरकाने महाराष्ट्र संघावर मात करून अंतिम सामना जिंकून विजेता ठरला.
रेल्वे संघाला अंतिम विजेतेपदाचा चषक व सुवर्ण पदक तर महाराष्ट्र संघाला अंतिम उपविजेतेपद चषक व रौप्य पदक मिळले.
महाराष्ट्राच्या पुरुष कबड्डी संघात
भेंड्याचे जिजामाता महाविद्यालयाचे विद्यार्थी शंकर गदई (कर्णधार) व राहुल खाटीक यांचे सह मयूर कदम (रायगड),असलम इनामदार (ठाणे ),आकाश शिंदे (नाशिक), अरकम शेख (मुंबई उपनगर),शेखर तटकरे (रत्नागिरी),सिद्धेश पिंगळे (मुंबई शहर),अक्षय उगाडे (मुंबई शहर),किरण मगर (नांदेड), देवेंद्र कदम (धुळे ),अक्षय भोईर (ठाणे) खेळाडूंचा संघात समावेश होता.
महाराष्ट्र संघाचे प्रशिक्षक म्हणून प्रशांत चव्हाण व संघ व्यवस्थापक आयुब पठाण यांनी काम पाहिले.