Thursday, August 11, 2022

तुम्ही जर वाहतुकीचे ‘हे’ नियम मोडले तर होणार जबरदस्त नुकसान

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: सुरक्षित वाहतुकीसाठी, एक जबाबदार नारिक म्हणून आपल्याला वाहतुकीचे नियम माहीत असायलाच हवे.

यामुळे आपण तर सुरक्षित राहालच पण रस्त्यांवर वाहतूक करणारे इतर लोकही सुरक्षित राहतील. वाहतूक व्यवस्था सुरक्षित रहावी यासाठी वाहतूक नियमांचे पालन होणे अत्यंत आवश्यक आहे.

अनेक वेळा नियमांची माहिती नसल्यानेही लोकांकडून कळत न कळत वाहतूक नियमांचे उल्लंघन होते. यामुळे आज आम्ही आपल्याला काही बेसिक वाहतूक नियमांसंदर्भात माहिती देत आहोत.

याच बरोबर, कोणत्या वाहतूक नियमाचे उलंघन केल्यानंतर, आपल्याला किती दंड भरावा लागेल, यासंदर्भातही आम्ही आपल्याला माहिती देणार आहोत.

नियमांचे उल्लंघन आणि दंड –

– गाडीमध्ये सीट बेल्ट न लावल्यास 1000 रुपये दंड आकारला जातो.

– ड्रायव्हिंग लायसन्स शिवाय गाडी चालवल्यास 5000 रुपये एवढा दंड आकारला जातो.

– ओव्हरस्पिडिंग केल्यास 2000 रुपयांपर्यंत दंड आकारला जातो.

– ड्रिंक अँड ड्राइव्ह केल्यास 10,000 रुपयांपर्यंतचा दंड आकारला जातो. एवढेच नाही, तर 6 महिन्यांसी कारावासाची शिक्षाही होऊ शकते.

– ड्रिंक अँड ड्राइव्ह करताना दुसऱ्यांद पकडले गेल्यास, 15 हजार रुपयांचा दंड आकारला जातो.

– इन्शुरन्स शिवाय गाडी चालवल्यास 5000 रुपयांपर्यंतचा दंड आकारला दातो. तसेच, 3 महिन्यांचा कारावासही होऊ शकतो.

– अल्पवयीन व्यक्तीने वाहन चालवल्यास संबंधिताच्या पालकांना 25 हजार रुपयांचा दंड होऊ शकतो. तसेच 3 वर्षांचा तुरुंगवासही होऊ शकतो.

– हेल्मेट शिवाय बाईक चालवल्यास 1000 रुपयांचा दंड होऊ शकतो.

– आरसी शिवाय वाहन चलवल्यास 10,000 रुपयांपर्यंतचा दंड आकारला जातो.

हे वाहतुकीचे काही बेसिक नियम आहेत. जे आपल्याला माहीत असायलाच हवेत. नव्हे याचे पालनही व्हायलाच हवे. यामुळे आपले मोठे नुकसान होण्यापासून वाचू शकता.

 

ताज्या बातम्या

भेंडा बुद्रुक ग्रामपंचायत हर घर तिरंगा अभियान राबविणार-सरपंच प्रा.उषा मिसाळ

नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक ग्रामपंचायत हद्दी मध्ये दि.१३ ऑगष्ट ते १५ ऑगष्ट दरम्यान भारत देश स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हर घर तिरंगा अभियान राबवणार आहे...

जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या नेवासा ते औरंगाबाद मोफत रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ

नेवासा/प्रतिनिधी श्री क्षेत्र नाणीज येथील जगदगुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या वतीने नेवासा फाटा येथे मोफत रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ मंगळवार दि.९ ऑगस्ट रोजी विधिवत...

पत्रकारिता अभ्यासक्रमात भाऊसाहेब कासार प्रथम तर रमेश खरबस द्वितीय

  माय महाराष्ट्र न्यूज:यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापिठाच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षेत शिक्षक भाऊसाहेब कासार हे प्रथम तर रमेश खरबस यांनी द्वितीय...

नागेबाबा मल्टीस्टेटच्या मयत सभासदाच्या वारसाला १० लाखाचा धनादेश प्रदान

राहुरी/प्रतिनिधी श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट सोसायटीच्या मयत सभासदाच्या वारसांना नागेबाबा सुरक्षा कवच योजनेअंतर्गत आज राहुरी येथे माजी मंत्री आ.प्राजक्त तनपुरे व शिवशाहीर विजय तनपुरे यांचे...

हनुमंतराय ही बुद्धी आणि शक्तीची देवता- स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज

माय महाराष्ट्र न्यूज: राहुल कोळसे:--  हनुमंतराय ही बुद्धी आणि शक्तीची देवता असल्याने प्रत्येकाने आपल्या जीवनात  हनुमंतरायांची मनोभावे सेवा केली पाहिजे असे प्रतिपादन श्री क्षेत्र...

यिन केंद्रीय कॅबिनेट सभापतीपदी दिव्या भोसले यांची वर्णी संपूर्ण राज्यातील युवकांमधून झाली निवड

मुंबई/प्रतिनिधी नुकत्याच झालेल्या यिन 'कॉनक्लेव २०२२' कार्यक्रमात भरघोस मताधिक्क्याने जळगावच्या दिव्या भोसले यांची यिन केंद्रीय कॅबिनेट सभापती म्हणून निवड करण्यात आली.राज्यातील लाखो युवकांनी दिव्या भोसले...
error: Content is protected !!