Thursday, August 11, 2022

अजित पवार सरकारवर भडकले, म्हणाले..

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:शिवसेना आमदारांच्या बंडखोरीनंतर राज्यात शिंदे आणि फडणवीस यांचे सरकार स्थापन झालं आहे. सरकार स्थापन

झाल्यानंतरही अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. दुसरीकडे सरकार सत्तेत आल्यानंतर मागच्या सरकारने मंजूर केलेल्या कामांना स्थिगित देण्याचा सपाटाच शिंदे सरकारने लावलेला दिसतो.

या सर्व पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत शिंदे सरकारवर सडकून टीका केली आहे. यावेळी मागच्या सरकारच्या कामांना स्थिगिती देण्यावरुन पवारांनी सरकारला लक्ष्य केलं आहे.

अधिवेशन तारखा सातत्यानं पुढे जात आहे. हे सरकार जर बहुमतात आहे तर मग अधिवेशन का घेत नाही. विधीमंडळात आमदारांना आपले प्रश्न मांडता येतात.

मात्र, जाणीवपूर्वक अजूनही मंत्रिमंडळ विस्तार आणि अधिवेशन घेतलं जात नाही.मागील काही दिवसांपासून विदर्भ, मराठवाडा येथे मुसळधार पाऊस पडत आहे. याठिकाणी

पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. परंतु, गेले काही दिवस केवळ दोघांचं मंत्रिमंडळ आहे. हा राज्याचा अपमान आहे. अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचा आत्महत्या होत आहे.

आपल्याकडे धरणाची पाणी पातळी चांगली आहे. अशी परिस्थिती जुलै मध्ये कधी पहिला मिळतं नाही. मी देखील काही भागात पाहणी केली आहे आणि आणखी काही भागात पाहणी

करण्यासाठी मी जाणार आहे. तात्काळ अधिवेशन बोलवलं पाहिजे. तिरुपती देवस्थान बाबत एक बातमी समोर येते आहे. मिलिंद नार्वेकर यांच्याकडे याबाबात बोलणं झालं आहे. ते लवकरच

याबाबात बोलतील. कदाचित आजचं ते बोलतील. भाविकांच्या भावना भडकावल्या जातं आहेत. आपल्या राज्याचा मुख्यमंत्री यांनी तात्काळ

त्या राज्याच्या मुख्यमंत्री यांच्याशी संपर्क साधावा आणि नेमकं खरं काय आहे ते समोर आणावं असे पवार म्हणाले.

ताज्या बातम्या

भेंडा बुद्रुक ग्रामपंचायत हर घर तिरंगा अभियान राबविणार-सरपंच प्रा.उषा मिसाळ

नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक ग्रामपंचायत हद्दी मध्ये दि.१३ ऑगष्ट ते १५ ऑगष्ट दरम्यान भारत देश स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हर घर तिरंगा अभियान राबवणार आहे...

जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या नेवासा ते औरंगाबाद मोफत रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ

नेवासा/प्रतिनिधी श्री क्षेत्र नाणीज येथील जगदगुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या वतीने नेवासा फाटा येथे मोफत रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ मंगळवार दि.९ ऑगस्ट रोजी विधिवत...

पत्रकारिता अभ्यासक्रमात भाऊसाहेब कासार प्रथम तर रमेश खरबस द्वितीय

  माय महाराष्ट्र न्यूज:यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापिठाच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षेत शिक्षक भाऊसाहेब कासार हे प्रथम तर रमेश खरबस यांनी द्वितीय...

नागेबाबा मल्टीस्टेटच्या मयत सभासदाच्या वारसाला १० लाखाचा धनादेश प्रदान

राहुरी/प्रतिनिधी श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट सोसायटीच्या मयत सभासदाच्या वारसांना नागेबाबा सुरक्षा कवच योजनेअंतर्गत आज राहुरी येथे माजी मंत्री आ.प्राजक्त तनपुरे व शिवशाहीर विजय तनपुरे यांचे...

हनुमंतराय ही बुद्धी आणि शक्तीची देवता- स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज

माय महाराष्ट्र न्यूज: राहुल कोळसे:--  हनुमंतराय ही बुद्धी आणि शक्तीची देवता असल्याने प्रत्येकाने आपल्या जीवनात  हनुमंतरायांची मनोभावे सेवा केली पाहिजे असे प्रतिपादन श्री क्षेत्र...

यिन केंद्रीय कॅबिनेट सभापतीपदी दिव्या भोसले यांची वर्णी संपूर्ण राज्यातील युवकांमधून झाली निवड

मुंबई/प्रतिनिधी नुकत्याच झालेल्या यिन 'कॉनक्लेव २०२२' कार्यक्रमात भरघोस मताधिक्क्याने जळगावच्या दिव्या भोसले यांची यिन केंद्रीय कॅबिनेट सभापती म्हणून निवड करण्यात आली.राज्यातील लाखो युवकांनी दिव्या भोसले...
error: Content is protected !!