भेंडा
नेवासा तालुक्यातील भेंडा गावचे जागृत ग्रामदैवत श्रीसंत नागेबाबांच्या चांदीच्या मूर्तीची (मुखवटा) भव्य मिरवणूक संपन्न झाली.
बुधवार दि.२७ जुलै रोजी श्रीसंत नागेबाबा व संतश्रेष्ठ सावता माळी यांची संयुक्त पुण्यतिथी साजरी केली जाणार आहे.तसेच श्रावणी तिसऱ्या सोमवारी दि.१५ ऑगस्ट रोजी नागेबाबा यात्रा उत्सव होत आहे.त्यानिमित्ताने पूर्वीची पंचधातूंची मूर्ती बदलून त्याठिकाणी नवीन चांदीची मूर्ती( मुखवटा) बसविण्यात येत आहे. दि.२५ रोजी दुपारी ४ वाजता नवीन चांदीच्या मूर्तीचे भेंडा येथे आगमन झाले असता फुलांनी सुजवलेल्या रथा मध्ये मूर्ती ठेऊन भेंडा बसस्थानक ते नागेबाबा मंदिर अशी भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. मिरवणूक मार्गावर सडा-रांगोळ्या करण्यात आल्या.मंदिर परिसर केळीचे खुंट व नारळाच्या झावळ्यानी सजविण्यात आले होते.पारंपरिक वाद्यांचा निनाद,फटाक्यांची आतिषबाजी करत स्त्री-पुरुष भाविक मिरवणुकीत सहभागी झाले होते.
बुधवार दि.२७ रोजी सकाळी १० वाजता महंत भास्करगिरीजी महाराज यांचे हस्ते मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा करण्यात येणार आहे.
तसेच रात्री ८ ते १० या वेळेत समाधान महाराज शर्मा यांचे कीर्तन होणार आहे.
भाविकांनी या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन नागेबाबा मंदिर व्यवस्थापन समिती व नागेबाबा परिवाराने केले आहे.