Wednesday, August 17, 2022

जायकवाडी धरणाचा पाणीसाठा 90 टक्क्याच्यावर;18 दरवाजे अर्धा फुटाने उचलले

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/सुखदेव फुलारी

पैठण येथील जायकवाडी 90 टक्के भरले असून धरणाचे 18 दरवाजे सोमवारी दि.२५ जुलै रोजी संध्याकाळी अर्ध्या फुटाने उघडण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या हस्ते धरणाचे 18 दरवाजे उघडण्यात आले असून, त्यातून एकूण 9 हजार 432 क्युसेकने विसर्ग करण्यात आला आहे. तर वरील धरणातून अजूनही 36 हजार 129 क्युसेकने आवक सुरूच आहे. अधीक्षक अभियंता समाधान सब्बीनवार, कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव,  उपविभागीय अधिकारी स्वप्नील मोरे यावेळी उपस्थित होते.

जुलै महिन्यातच नाशिक जिल्ह्यात दमदार पाऊस झाल्याने वरील धरणे पूर्ण क्षमतेने भरली होती. त्यामुळे या धरणांमधून गोदावरी नदीत विसर्ग करण्यात येत आहे. तर पाण्याची आवक मोठ्याप्रमाणावर झाल्याने जायकवाडी धरणातील पाणीपातळी झपाट्याने वाढल्याचे पाहायला मिळाले. जायकवाडी धरणात 90 टक्के पाणीसाठा झाल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. सद्या धरणाचे 18 दरवाजे उघडण्यात आले असून, टप्या-टप्याने पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येणार आहे. सद्या जायकवाडी धरणातून जलविद्युत केंद्रातून 1 हजार 589 क्युसेक, उजवा कालव्यातून 500 क्युसेक आणि 18 मुख्य दरवाज्यातून 9 हजार 432 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे.

*गोदावरी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा*

जायकवाडी धरणातून पाणी सोडल्यावर याचा फटका गोदावरी काठावर असलेल्या गावांना बसतो. त्यामुळे पाणी सोडण्यापूर्वी नदी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जायकवाडीतून पाणी सोडल्यावर मराठवाड्यातील पंधराशेहून अधिक गावांना याचा फटका बसतो. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने या गावांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत. यापूर्वीच जलविद्युत केंद्रातून आणि उजव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आला होता. मात्र आता धरणाचे मुख्य दरवाजे सुद्धा उघडण्यात आले आहे.

*जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या वतीने आवाहन*

गोदावरी नदी काठच्या दोन्ही तीरावरील लोकांना सतर्क राहण्याचा इशारा जायकवाडी पाटबंधारे विभागाने दिला आहे. तसेच नदीपात्रात कुणीही जाऊ नये, पाळीव प्राणी, गुरेढोरे, विद्युत मोटारी तसेच इतर साहित्य तात्काळ काढून घ्यावे. कुठलीही जीवित वा वित्तहानी होणार नाही, याबाबत संबंधित गावांना  तात्काळ सावधानतेचा इशारा देणेबाबत संबधी संबंधीत यंत्रणेने खबरदारी घ्यावी, असे आवाहन जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

 

नदी काठच्या गावांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

 

ताज्या बातम्या

error: Content is protected !!