माय महाराष्ट्र न्यूज:राज्याच्या वातावरणात सातत्याने बदल होताना दिसुन येत आहेत. राज्यातील काही भागामध्ये उष्णतेचा तडाखा जाणावत आहे तर काही भागात ढगाळ वातावरण
निर्माण झाले आहे. दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार उद्यापासून (23 जून) राज्यातील काही भागांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.कोकणातील काही भागासह मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात
पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर 24 आणि 25 जूनपासून पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तर मराठवाडा मधील काही भागात मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता आहे.
मान्सून लांबल्यामुळे राज्यातील शेतकरी अडचणीत आला आहे. बळीराजा समोर मोठं संकट उभं राहील आहे. मात्र, उद्यापासून राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे हा बळीराजासाठी मोठा दिलासा असणार
आहे.पुढील 4 दिवसांमध्ये राज्यात मेघगर्जनेसह मुसळधार ते हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईतही मुसळधार पाऊस हजेरी लावण्याची शक्यता वर्तवली आहे. उद्या 22 जूनला मुंबईत मध्यम तर 23-24 जून रोजी मुसळधार
पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामानशास्त्र पुणे विभागाचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी याबाबतची माहिती दिली आहे.राज्यातील जवळपास सर्व भागांमध्ये येत्या 3 दिवसात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
तर 23-24 जूनला विदर्भात मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर, 24 जूनला कोकणातही मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात मात्र हलक्या सरींचा अंदाज आहे.पुण्यातही
पुढील २ ते ३ दिवसांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये येत्या 3 दिवसात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
तर 23-24 जूनला विदर्भात मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.