Thursday, August 11, 2022

हे’ नियम 1 ऑगस्टपासून बदलणार, तुमच्या खिशावर

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:महिना बदलला की अर्थविषयक अनेक गोष्टींमध्ये पहिल्या तारखेपासून काही बदल होतात. हे बदल तुमच्या आमच्याशी संबंधित असतात.

त्यामुळे त्याचा आपल्यावर परिणाम होतो. म्हणून या बदलेल्या नियमांची आपल्या सर्वांना माहिती असणे गरजेचं असतं. जुलै महिना संपण्यासाठी काही दिवस शिल्लक राहिले आहे.

येत्या ऑगस्ट महिन्यात कोणते नवे नियम लागू होणार किंवा कोणते नियम बदलणार यावर एक नजर टाकुया.ऑगस्ट महिन्यात बँकिंग व्यवस्थेशी संबंधित अनेक नियम आणि बँक-एटीएमशी

संबंधित अनेक नियम बदलणार आहेत. या बदलामुळे तुम्हालाही काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते आणि त्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे.चेक क्लिअरन्सबाबत

RBI च्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून बँक ऑफ बडोदाने चेक पेमेंट नियमांमध्ये काही बदल केले आहेत. बँकेने आपल्या ग्राहकांना सांगितले आहे की 1 ऑगस्टपासून 5 लाख किंवा त्याहून

अधिक रकमेच्या चेकच्या पेमेंटसाठी पॉझिटिव्ह पे सिस्टम अनिवार्य असेल. याशिवाय पेमेंट केले जाणार नाही.रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकिंग फसवणूक टाळण्यासाठी 2020 मध्ये

चेकसाठी ‘पॉझिटिव्ह पे सिस्टम’ सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. या सिस्टमअंतर्गत, चेकद्वारे 50,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम भरण्यासाठी काही महत्त्वाची माहिती आवश्यक असू शकते.

या सिस्टमद्वारे चेकची माहिती मेसेज, मोबाईल अॅप, इंटरनेट बँकिंग किंवा एटीएमद्वारे दिली जाऊ शकते. चेकचे पेमेंट करण्यापूर्वी हे तपशील तपासले जातात.

ताज्या बातम्या

भेंडा बुद्रुक ग्रामपंचायत हर घर तिरंगा अभियान राबविणार-सरपंच प्रा.उषा मिसाळ

नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक ग्रामपंचायत हद्दी मध्ये दि.१३ ऑगष्ट ते १५ ऑगष्ट दरम्यान भारत देश स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हर घर तिरंगा अभियान राबवणार आहे...

जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या नेवासा ते औरंगाबाद मोफत रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ

नेवासा/प्रतिनिधी श्री क्षेत्र नाणीज येथील जगदगुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या वतीने नेवासा फाटा येथे मोफत रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ मंगळवार दि.९ ऑगस्ट रोजी विधिवत...

पत्रकारिता अभ्यासक्रमात भाऊसाहेब कासार प्रथम तर रमेश खरबस द्वितीय

  माय महाराष्ट्र न्यूज:यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापिठाच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षेत शिक्षक भाऊसाहेब कासार हे प्रथम तर रमेश खरबस यांनी द्वितीय...

नागेबाबा मल्टीस्टेटच्या मयत सभासदाच्या वारसाला १० लाखाचा धनादेश प्रदान

राहुरी/प्रतिनिधी श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट सोसायटीच्या मयत सभासदाच्या वारसांना नागेबाबा सुरक्षा कवच योजनेअंतर्गत आज राहुरी येथे माजी मंत्री आ.प्राजक्त तनपुरे व शिवशाहीर विजय तनपुरे यांचे...

हनुमंतराय ही बुद्धी आणि शक्तीची देवता- स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज

माय महाराष्ट्र न्यूज: राहुल कोळसे:--  हनुमंतराय ही बुद्धी आणि शक्तीची देवता असल्याने प्रत्येकाने आपल्या जीवनात  हनुमंतरायांची मनोभावे सेवा केली पाहिजे असे प्रतिपादन श्री क्षेत्र...

यिन केंद्रीय कॅबिनेट सभापतीपदी दिव्या भोसले यांची वर्णी संपूर्ण राज्यातील युवकांमधून झाली निवड

मुंबई/प्रतिनिधी नुकत्याच झालेल्या यिन 'कॉनक्लेव २०२२' कार्यक्रमात भरघोस मताधिक्क्याने जळगावच्या दिव्या भोसले यांची यिन केंद्रीय कॅबिनेट सभापती म्हणून निवड करण्यात आली.राज्यातील लाखो युवकांनी दिव्या भोसले...
error: Content is protected !!