Wednesday, August 17, 2022

ज्ञानेश्वर महाविद्यायात कारगिल विजय दिवस साजरा

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

नगरच्या 17 महाराष्ट्र बटालियन एनसीसीचे कमांडिंग ऑफिसर कर्नल जीवन झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय छात्र सेनेच्या वतीने श्री ज्ञानेश्वर महाविद्यालयात कारगिल विजय दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.

प्रारंभी कारगिल युद्धात शहीद झालेल्या भारतीय सेनेतील शहीद जवानाना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.गोरक्षनाथ कल्हापूरे म्हणाले, आजचा हा दिवस भारतीय सेनेतील कारगिल युद्धात शहीद झालेल्या भारतीय सैन्याच्या शौर्याची आठवण सदैव जागृत ठेवणारा हा दिवस असून देशाबद्दल त्यांची त्यागाची आणि भारतीय सेनेतील जवानांच्या प्रती कृतज्ञतेची भावना व्यक्त करणारा हा दिवस आहे. हा दिवस संपूर्ण भारतात उत्साहानं साजरा करण्यात येत आहे. भारतीय सैन्याचे देशप्रेम, स्वयंशिस्त, श्रद्धा, शारीरिक व मानसिक सामर्थ्य तसेच वीरवृत्ती उल्लेखनीय असते त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून भारत मातेच्या सेवेसाठी जास्तीत जास्त युवकांनी भारतीय सेनेत जाऊन देशसेवा करावी देशहितासाठी कार्य करावे असे आव्हान केले.

सेवानिवृत्त जवान पराजी तागड मेजर यांनी त्याचे प्रत्यक्ष कारगिल युद्धातील त्यांचे अनुभव विद्यार्थ्यांना सांगून संकटास कसे सामोरे जावे लागते हे सांगितले. त्यामुळे जीवनात कितीही संकटे निर्माण झाली तर भारतीय सेनेतील त्यांचे कार्य, धाडस, कर्तुत्व,शिस्त समोर ठेवून आलेल्या प्रसंगांना सामोरे जावे असे ते म्हणाले.

शहीद जवानांच्या स्मृतिप्रीत्यर्थ वृक्षारोपण व महाविद्यालय परिसराची ही स्वच्छता करण्यात आली. वरिष्ठ व कनिष्ट महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.अरुण अनवट, प्रा. दशरथ आयनर , डॉ. अमन शेख, डॉ.संजय घनवट डॉ.दिगंबर सोनवणे डॉ. भीमराज सोनवणे, प्रा. प्रकाश वाळुंज,डॉ.चांगदेव कदम, डॉ. सुरेश काळे, डॉ. उमेश कांबळे,डॉ.संजय शिंदे, डॉ.बाळासाहेब जगताप, प्रा.नितीन भोगे, ग्रंथपाल प्रकाश कोकणे,प्रा.राधा मोटे, मेजर मंदाकिनी थावरे यांचेसह प्राध्यापक व कर्मचारी वृंद, विद्यार्थी, राष्ट्रीय छात्र सेनेतील छात्र मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राष्ट्रीय छात्र सेना विभागाचे प्रमुख ले.सुभाष आगळे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!