Thursday, August 11, 2022

धक्कादायक काही विद्यार्थी कंडोमचा करत आहे या गोष्टींसाठी वापर ;फ्लेवर्ड कंडोमची विक्री आश्चर्यकारकपणे वाढली

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:कंडोमचा वापर गर्भनिरोधक तसेच लैंगिक आजारापासून बचाव व्हावा म्हणून केला जातो. मात्र पश्चिम बंगालमधील दुर्गापूर या भागातील

काही विद्यार्थी कंडोमचा वापर नशा करण्यासाठी करत असल्याचे समोर आले आहे. याच कारणामुळे दुर्गापूरमधील शहरातील दुर्गापूर सिटी सेंटर, विधाननगर, मुचीपारा आणि बेनाचिती,

सी झोन, ए झोनसह शहरातील अनेक भागांमध्ये फ्लेवर्ड कंडोमची विक्री आश्चर्यकारकपणे वाढली आहे.न्यूज १८ या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार दुर्गापूर शहरामध्ये फ्लेवर्ड कंडोमच्या

विक्रीमध्ये आश्चर्यकारकपणे वाढ झाली आहे. या कंडोमचा वापर तरुण नशेसाठी करत आहेत. कंडोम खरेदी करुन ते गरम पाण्यात भिजायला टाकले जात आहेत. त्यानंतर हे पाणी

पिऊन तरुणांकडून नशा केली जात आहे. यामुळे तरुण जवळपास दहा ते १२ तास नशेत राहतात असे सांगण्यात येत आहे. याच कारणामुळे या भागात सध्या कंडोमची विक्री वाढलेली आहे.

कंडोमच्या वाढत्या विक्रीबाबत दुर्गापूरमधील एका औषध विक्रेत्याने प्रतिक्रिया दिलेली आहे. “पूर्वी दिवसभरात एका औषध विक्रेत्याचे तीन ते चार कंडोमचे पॉकेट विकले जायचे. मात्र आता ही विक्री वाढली

आहे,” असे औषध विक्रेत्याने सांगितले आहे.दुर्गापूर आरई कॉलेज मॉडेल स्कूलचे रसायनशास्त्राचे शिक्षक नुरुल हक यांनी कंडोमच्या मदतीने केल्या जाणाऱ्या नशेबाबत सविस्तर सांगितले आहे.

गरम पाण्यात भिजवत ठेवल्यामुळे कंडोमधील ऑरगॅनिक मॉल्यूक्यूल्स तुटतात. त्यातून अल्कोहोल तयार होते. याच रसायनाचा तरुण नशा म्हणून वापर करतात असे नुरुल हक यांनी सांगितले आहे.

दरम्यान, पश्चिम बंगाल पोलिसांनी याबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

ताज्या बातम्या

भेंडा बुद्रुक ग्रामपंचायत हर घर तिरंगा अभियान राबविणार-सरपंच प्रा.उषा मिसाळ

नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक ग्रामपंचायत हद्दी मध्ये दि.१३ ऑगष्ट ते १५ ऑगष्ट दरम्यान भारत देश स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हर घर तिरंगा अभियान राबवणार आहे...

जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या नेवासा ते औरंगाबाद मोफत रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ

नेवासा/प्रतिनिधी श्री क्षेत्र नाणीज येथील जगदगुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या वतीने नेवासा फाटा येथे मोफत रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ मंगळवार दि.९ ऑगस्ट रोजी विधिवत...

पत्रकारिता अभ्यासक्रमात भाऊसाहेब कासार प्रथम तर रमेश खरबस द्वितीय

  माय महाराष्ट्र न्यूज:यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापिठाच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षेत शिक्षक भाऊसाहेब कासार हे प्रथम तर रमेश खरबस यांनी द्वितीय...

नागेबाबा मल्टीस्टेटच्या मयत सभासदाच्या वारसाला १० लाखाचा धनादेश प्रदान

राहुरी/प्रतिनिधी श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट सोसायटीच्या मयत सभासदाच्या वारसांना नागेबाबा सुरक्षा कवच योजनेअंतर्गत आज राहुरी येथे माजी मंत्री आ.प्राजक्त तनपुरे व शिवशाहीर विजय तनपुरे यांचे...

हनुमंतराय ही बुद्धी आणि शक्तीची देवता- स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज

माय महाराष्ट्र न्यूज: राहुल कोळसे:--  हनुमंतराय ही बुद्धी आणि शक्तीची देवता असल्याने प्रत्येकाने आपल्या जीवनात  हनुमंतरायांची मनोभावे सेवा केली पाहिजे असे प्रतिपादन श्री क्षेत्र...

यिन केंद्रीय कॅबिनेट सभापतीपदी दिव्या भोसले यांची वर्णी संपूर्ण राज्यातील युवकांमधून झाली निवड

मुंबई/प्रतिनिधी नुकत्याच झालेल्या यिन 'कॉनक्लेव २०२२' कार्यक्रमात भरघोस मताधिक्क्याने जळगावच्या दिव्या भोसले यांची यिन केंद्रीय कॅबिनेट सभापती म्हणून निवड करण्यात आली.राज्यातील लाखो युवकांनी दिव्या भोसले...
error: Content is protected !!